PM Narendra Modi : लोकसंख्या पुण्यापेक्षा कमी, दरडोई उत्पन्न तब्बल 57 लाख; ‘या’ देशावर मोदींची नजर

PM Modi Brunei Visit Brunei Population : ब्रुनेईचे क्षेत्रफळ 5 हजार 770 वर्ग किलोमीटर असून लोकसंख्येचे घनत्व 88 प्रति किमी एवढे आहे.
Narendra Modi Brunei Visit
Narendra Modi Brunei VisitSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख. मात्र, भारत असूनही विकसनशील देश असून दरडोई उत्पन्न जेमतेम दोन लाख रुपये एवढेच आहे. पण जगात एक असा देश आहे, ज्या देशाची लोकसंख्या जेमतेम साडे चार लाख म्हणजेच पुण्यातील एखाद्या विधानसभा मतदारसंघाएवढी आहे. विकासाच्या बाबतीत मात्र या देशाने बड्या राष्ट्रांनाही मागे टाकले आहे.

विकसित भारताचे स्वप्न पाहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर या देशावर पडली आहे. ब्रुनेई असे या देशाचे नाव आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त मंगळवारी या देशात दाखल झाले. ते सुमारे 24 तास या देशात असतील. भारताचे पंतप्रधान या देशात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या भेटीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

Narendra Modi Brunei Visit
Anti Rape Bill : आधी दिशा, शक्ती अन् आता अपराजिता..! तो ऐतिहासिक दिवस कधी उजाडणार?

श्रीमंत इस्लामिक राष्ट्र म्हणून या देशाची ओळख आहे. या देशाला निसर्गाने भरभरून दिले आहे. पेट्रोलियम साठ्यांमुळे हा देश मालामाल झाला आहे. ब्रुनेईचे दरडोई उत्पन्न तब्बल 57 लाख रुपये एवढे आहे. देशाची लोकसंख्या जेमतेम साडे चार लाख असल्याने त्यांची कमाई प्रति महिना सुमारे पाच लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे या देशाच्या डोक्यावर कसलेही कर्ज नाही. ब्रुनेईचे क्षेत्रफळ 5 हजार 770 वर्ग किलोमीटर असून लोकसंख्येचे घनत्व 88 प्रति किमी एवढे आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचे महत्व

मोदींच्या दौऱ्यात अनेक महत्वाच्या बैठका व भेटीगाठी होणार आहेत. तेथील सुलतान हाजी हस्सानल बोल्कियाह यांच्या आमंत्रणावरून मोदी या देशात गेले आहेत. भारताकडून आपल्या परराष्ट्र धोरणात दक्षिण पूर्ण आशियाई देशांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. हा दौरा त्याचाच एक भाग मानला जात आहे. समृध्द देशांसोबत विविध पातळ्यांवर चांगले परराष्ट्र संबंध निर्माण करून देशाच्या विकासात भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Narendra Modi Brunei Visit
Anti Rape Bill : ममतांना ‘अपराजिता’ वाचवणार? राष्ट्रपतींच्या एका सहीवर सरकारची भिस्त...

चीनलाही इशारा

मोदींचा ब्रुनेई दौरा चीनसाठीही इशारा मानला जात आहे. दक्षिण चीन सुमद्राजवळच ब्रुनेई आहे. इथूनच हिंद प्रशात भागात समुद्री व्यापाराचा सर्वात महत्वाचा मार्ग जातो. त्यामुळेच ब्रुनेई सोबत आर्थिक तसेच राजनीतिक संबंध निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा भारतालाच होणार आहे. या देशातून पंतप्रधान मोदी पुढे सिंगापूरला रवाना होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com