Modi Government: पंतप्रधान मोदी 'अॅक्शन मोड'मध्ये! सरकारचा 'इंडिगो'ला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा निर्णय
New Delhi News: इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कंपनीनं पुण्या,मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळावरची उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका विमान प्रवाशांना बसला होता.या विरोधात प्रवाशांनी संतापही व्यक्त केला होता. विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सलाही हजारो कोटींचा फटका बसला. या प्रकाराची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) गंभीर दखल घेतल्याचं समोर आलं होतं. आता केंद्र सरकारनंही मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आता मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या विमान उड्डाणांमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमान प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशानं सरकारनं इंडिगो एअरलाईन्सच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात 5 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबतची माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.
भारत सरकारने यापूर्वीच विमान कंपनी इंडिगोला येणाऱ्या समस्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. याचसोबत विमान प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी 24X7 नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला होता. इंडिगो एअरलाइनच्या सेवेत सातत्यानं नवीन उड्डाण ड्युटी टाइम नियम आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. याचमुळे विमानतळांवरही मोठा गोंधळ उडून लाखो प्रवासी अडकल्याचं दिसून आलं होतं.
आता केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला महत्त्वाचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. यात मंत्रालयानं इंडिगो एअरलाईन्सला जोपर्यंत त्यांचे कर्मचारी आणि कामकाजात स्थिरता येत नाही, तोपर्यंत कपात केलेल्या वेळापत्रकानुसारच कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर आता कंपनीकडून विमान उड्डाणांची नवी यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
याचदरम्यान,देशातील नामांकित एअरलाइन्स कंपनीपैकी एक असलेल्या इंडिगो मोठ्या अडचणीत सापडली आहे.प्रमुख शहरांसह देशभरातील अनेक विमानतळावरची उड्डाणे रद्द झाल्यामुळे विान प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.या अचानक आलेल्या संकटामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या सर्व उद्भवलेल्या परिस्थितीची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.केंद्रीय संसदीय व अल्पसंख्याक कार्य मंत्री किरण रिजिजू(Kiren Rijiju) यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंतप्रधानांनी विमान प्रवाशांची कोणत्याही परिस्थितीत गैरसोय होता कामा नये.व्यवस्था दुरुस्त करण्याच्या नावाखाली नागरिकांना त्रास देणं योग्य नसल्याचंही मोदींनी सांगितलं.चांगले सरकार म्हणजे लोकांना सुविधा देणे,त्रास देणे नव्हे. नियम आणि कायदे योग्य असले तरी त्यांची अंमलबजावणी जनसामान्यांना त्रास न होऊ देता करावी, अशा स्पष्ट सूचनाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिल्याचं मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

