PM Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन; म्हणाले...

PM Narendra Modi Inaugurates New Naval Ships : भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. INS सुरत, INS निलगिरी आयएनएस INS वाघशीर (पाणबुडी) या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi in Mumbai Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (ता.15) मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) जहाजांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. INS सुरत, INS निलगिरी आयएनएस INS वाघशीर (पाणबुडी) या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.

यानिमित्त नौदलाकडून भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या तिन्ही युद्धनौकांचं राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते करण्यात आलं. नौदलाच्या (Navy) कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी या तिन्ही युद्धनौका 'मेड इन इंडिया' असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी या युद्धनौका बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्यासह सर्व देशवासियांचं अभिनंदन केलं.

पंतप्रधान म्हणाले, 15 जानेवारी हा भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येक वीराला मी नमन करतो. आपल्या देशाचील नौसेनेचा एक गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) नौसेनेला नवीन सामर्थ्य आणि नवीन व्हिजन दिलं.

Narendra Modi
Ajit Pawar NCP : मोठी घडामोड; बीड राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, मुंडे यांचा राजीनामा पक्ष घेणार?

त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धरतीवर 21 व्या युगात याच नौसेनेसा सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. ते म्हणजे आपण एकत्रितपणे तिन युद्धनौका नौसेनेत दाखल करत आहोत. आजचा दिवस देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याला बळ देणारा आहे. भारत हा विस्तारवादी नव्हे विकासवादाने काम करतो.

Narendra Modi
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना एक अन् बाकीच्यांना दुसरा न्याय का? राऊतांनी मोदींच्या दौऱ्याशी जोडले कनेक्शन

तर आज वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मला मिळालं. नौसेना सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. भारताने जगाला सागर हा मंत्र दिला. समुद्राला सुरक्षित बनवायचं आहे, त्यादृष्टीनं काम करूया, असं आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून देशवासियांना केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com