Ajit Pawar NCP : मोठी घडामोड; बीड राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, मुंडे यांचा राजीनामा पक्ष घेणार?

Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता न्यायालयीन घडामोडींनी वेग आला आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar and Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेला आहे. याचे धक्के आता दिल्लीपर्यंत गेले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आहे. आज (ता.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री धनंजय मुंडे परळीकडे निघाले आहेत. यामुळे उलट सुलट चर्चांना उत आला आहे. अशातच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांना हा जबर धक्का मानला जात आहे.

संतोष देशमुख हत्याकाडांत मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप सध्या बीडमधून केला जातोय. या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी संबंधीत लोक असल्याचा दावा देखील केला जातोय. यामुळे सध्या त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे, असे अनेकदा पक्षातील आमदार आणि नेत्यांनी थेट बोलून दाखवले आहे.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांची बाॅडी घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा तो 'यू-टर्न'; खासदार सोनवणे यांच्या शंकेनं खळबळ

यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. अशातच पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड राष्ट्रवादीशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या बीडच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यात आल्याचे आता दबक्या आवाजत चर्चा सुरू झाली आहे.

बीड हत्याकांडात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचा थेट सहभाग आहे. तर याच्यामुळेच जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबातची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनी देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याचे सांगितले आहे.

तसेच तालुक्याची जी कार्यकारिणी होती, तीदेखील बरखास्त करण्यात आली आल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. तटकरे यांनी, जोपर्यंत नव्या जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कमान आता राजेश्वर चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून दिली आहे.

चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका

बीड हत्याकांडासह अनेक हिंस्त्र आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश दिसून येत आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवडी येथून पुढे चारित्र्याची पडताळणी करूनच केल्या जातील असाही निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचनाच तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना दिल्या आहेत.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : पोलिसांचा टॉवरला बंदोबस्त; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

मुंडे कोणती भूमीका घेणार?

दरम्यान धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली असून काही सूचना केल्याचे कळत आहे. तर आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला न थांबला ते परळीसाठी रवाना झाले. यामुळे धनंजय मुंडे परळीत आता कोणती भूमीका घेणार यासह त्यांचा पक्ष राजीनामा घेणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com