Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना एक अन् बाकीच्यांना दुसरा न्याय का? राऊतांनी मोदींच्या दौऱ्याशी जोडले कनेक्शन

PM Narendra Modi Meet With Mahayuti MLA : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असून महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत.
Sanjay Raut, Narendra Modi, Dhananjay Munde
Sanjay Raut, Narendra Modi, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. या दौऱ्यात पंतप्रधान महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. त्यावरून राऊतांनी धनंजय मुंडे यांना एक न्याय बाकीच्यांना दुसरा न्याय असे का, असा सवाल केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप होत आहेत. सध्या मुंडे हे परळीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून राऊत म्हणाले, मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही, पण असे अनेक मंत्री आहेत, ज्यांच्यावर पंतप्रधानांनी आरोप केले होते. मग त्यांना पण दूर ठेवणार का? असा सवाल राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut, Narendra Modi, Dhananjay Munde
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती? अजित पवार नाराज... थेट म्हणाले, 'किमान विश्वासात'

धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही, तोपर्यंत हे काही करून फायदा नाही. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात आहेत, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार, अशी टीका राऊतांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला मंगळवारी प्रत्युत्तर दिले. त्यावरही राऊतांनी भाष्य केले.

राऊत म्हणाले, शरद पवारांनी एक माहिती दिली आहे. ते जो प्रसंग सांगत आहेत, अमित शाह हे त्यावेळेचे गुजरात दंगलीचे बरखास्त गृहमंत्री होते. मी देखील त्यांना अनेक वेळा अरुण जेटली यांच्या संसदेच्या कार्यालयाबाहेर बसलेले बघितले आहे. ज्यांनी मदत केली त्याच कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा काम त्यांनी केल्याची टीका राऊतांनी केली.

Sanjay Raut, Narendra Modi, Dhananjay Munde
Umarga Vidhansabha : शिंदेंच्या माजी आमदारामुळे ठाकरेंच्या 'या' शिलेदाराची आमदारकी धोक्यात?

काही गोष्टी मला देखील माहीत आहेत. पण मी गुप्तता बाळगणारा माणूस आहे, काही गोष्टी या सांगायच्या नसतात. बाळासाहेबांनी मोदींना देखील मदत केली आहे, त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढताना बाळासाहेब हे त्यांच्या मागे ठामपणे उभे होते. असेच काहीतरी अमित शाह यांच्या बाबतीत झाले असेल, त्याशिवाय पवारसाहेब असेल बोलणार नाहीत, असे राऊतांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com