Narendra Modi News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अवघ्या काही दिवस आधी सोशल मीडियावर त्यांना जिवे मारण्याची कथित धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या विविध अधिकृत कार्यक्रमांसह 'मेलबर्न मीट्स मोदी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ते ऑस्ट्रेलियन-भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. मात्र, या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना लक्ष्य करण्याची धमकी आल्याने ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
धमकीचे वृत्त समोर येताच ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू केला आहे. सोशल मीडियावरील संबंधित अकाऊंट्स आणि पोस्टचा माग काढला जात असून, यामागे कोणत्या समाजकंटकांचा किंवा संघटनांचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी 'मेलबर्न मीट्स मोदी' कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील विशेष सुरक्षा पथके आता पूर्णपणे हाय अलर्टवर आली आहेत. कार्यक्रम स्थळाची सुरक्षा, प्रवेश नियंत्रण आणि गुप्तचर यंत्रणांचा समन्वय वाढवण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणाही ऑस्ट्रेलियन प्रशासनाच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या धमकीनंतरही दौऱ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, कडेकोट बंदोबस्तात हा दौरा पार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.