

New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं 2014,2019 आणि 2024 साली अशा सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या. मोदी यांची ही पंतप्रधानपदाची सलग तिसरी टर्म आहे. त्यांनी बुधवारी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारतात सर्वाधिक काळ सलग 'निर्वाचित' पंतप्रधान म्हणून काम करण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडत एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षाचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4 हजार 398 दिवसांचा विक्रम मोडत स्वतःच्या नावे 4 हजार 399 दिवसांचा नवा विक्रम रचला आहे. मात्र,मोदींच्या या नव्या विक्रमावरुन आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झाल्याचं दिसून येत आहे.
मात्र, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या नव्या रेकॉर्डसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांनी सोशल मीडियावरील X या प्लॅटफॉर्मवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांचं नव्या विक्रमासाठी अभिनंदन केलं आहे. त्यांनी “नरेंद्र मोदी हार्दिक शुभेच्छा!आज ते भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनले आहेत असल्याचं म्हटलं आहे.
तसेच मेलोनी यांनी पोस्टमध्ये अलिकडेच रोममध्ये आपली पुन्हा भेट झाल्याचा उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारतासोबत एका विशेष भागीदारीची सुरुवात करताना आनंद होत आहे. त्यामुळे आपल्या देशांना,जनतेला नवीन संधी निर्माण होणार आहेत” असंही मेलोनी यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या शुभेच्छा दिल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर नव्या विक्रमानंतर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि राजनैतिक संबंध हे आंतरराष्ट्रीय स्तरावर 'मेलोडी'या नावाने प्रसिद्ध आहेत.
गेल्या मे महिन्यात पंतप्रधान मोदी आपल्या पाच देशांच्या राजनैतिक दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात इटलीची राजधानी रोम येथे दाखल झाले होते. रोममध्ये पोहोचल्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आणि दोघांनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर सखोल चर्चाही झाली होती.
मात्र, जेव्हा पंतप्रधान मोदी इटलीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मेलोनी यांना पार्ले कंपनीची 'मेलोडी'ही टॉफी भेट दिली होती. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदींवर सडकून टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.