Sharad Pawar : मोदींची राज्यसभेत नेहरूंवर टीका; शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; म्हणाले...

Sharad Pawar On Pm Narendra Modi : "राजकारणात वेगवेगळी विचारधारा आणि मतभिन्नता असते. पण...", असंही शरद पवारांनी म्हटलं.
sharad pawar narendra modi jawaharlal nehru
sharad pawar narendra modi jawaharlal nehru sarkarnama
Published on
Updated on

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचं संसदीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Pm Narendra Modi ) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी ( 5 फेब्रुवारी ) उत्तर देताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होता. आज बुधवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी पुन्हा नेहरूंना लक्ष्य केलं आहे. यावरून माजी केंद्रीय, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते दिल्लीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

sharad pawar narendra modi jawaharlal nehru
Rahul Narwekar: राष्ट्रवादीचाही निकाल शिवसेनेप्रमाणेच ? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिले 'हे' संकेत...

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

"मी माजी पंतप्रधान नेहरूंना अलीकडे जास्त आठवत आहे. एकदा नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात नेहरूंनी म्हटलेलं, 'मला कुठलंही आरक्षण आवडत नाही. नोकरीतील आरक्षण तर कदापीही आवडत नाही.' ते जन्मजात आरक्षणाच्या विरोधात आहेत. एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण मिळालं, तर सरकारी कामाकाजाचा स्तर खालावतो, असंही नेहरूंचं मत होतं," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, "पंतप्रधानांचं राज्यसभेतील भाषण ऐकून मला दु:ख झालं. पंतप्रधान देशाचे असतात, कुठल्याही एका पक्षाचे नाही. देशाची जबाबदारी पंतप्रधानांच्या खांद्यावर असते. मोदींनी राज्यसभेत नेहरूंवर टीका केली. पण, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींबरोबर जवाहरलाल नेहरूंनीही योगदान दिलं आहे.

sharad pawar narendra modi jawaharlal nehru
Sharad Pawar News: चिन्ह जाऊ दे ! आमचा नेता भक्कम आहे!

"स्वातंत्र्यानंतर देशाचा चेहरा बदलणे आणि भारताचं नाव जगभरात पोहोचवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, त्यामध्ये जवाहरलाल नेहरूही होते. लोकशाहीला ताकद देण्याचं काम नेहरूंनी केलं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नेहरूंनी चालना दिली," असं शरद पवारांनी म्हटलं.

sharad pawar narendra modi jawaharlal nehru
Sharad Pawar News : अजित पवारांच्या 'त्या' सहा आमदारांचा शरद पवारांनी आधीच बंदोबस्त केला?

"राजकारणात वेगवेगळी विचारधारा आणि मतभिन्नताही असते. पण, नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचं देशासाठीचं योगदान आपण विसरू शकत नाही," असं शरद पवारांनी सांगितलं.

sharad pawar narendra modi jawaharlal nehru
Ulhas Bapat on NCP : घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं निवडणूक आयोगाच्या निकालावर मोठं वक्तव्य; आता सुप्रीम कोर्टानं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com