Modi Address to Nation: PM मोदी रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार! महिला आरक्षण विधेयक लागू करणार का?

Modi Address to Nation: लोकसभेत काल नारीशक्ती वंदन अधिनियमासह १०३ वी घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळलं गेलं, त्यामुळं भाजपप्रणित एनडीए सरकार बॅकफूटवर आलं आहे.
PM Modi Address to Nation:
PM Modi Address to Nation:
Published on
Updated on

Modi Address to Nation: लोकसभेत काल नारीशक्ती वंदन अधिनियमासह १०३ वी घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळलं गेलं, त्यामुळं भाजपप्रणित एनडीए सरकार बॅकफूटवर आलं आहे. तर दुसरीकडं २०२३ मध्ये पारित केलेलं महिला आरक्षण विधेयक सरकारनं तात्काळ लागू करावं, त्याला आमचा शतप्रतिशत पाठींबा असल्याचं काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचं म्हणणं आहे. त्यामुळं आता आता भाजप कोंडीत सापडला असून देशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणं आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान बोलण्याची शक्यता आहे. काल विधेयक फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रीमंडळाची सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना इशारा देताना विधेयकाला पाठिंबा न दिल्यानं त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हटल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. त्याचबरोबर भाजपच्यावतीनं गावागावात जाऊन काँग्रेसनं कसा महिला आरक्षणाला विरोध केला याचा प्रचार करण्याच्या सुचनाही दिल्याचं कळतं आहे.

PM Modi Address to Nation:
Priyanka Gandhi: मोदी सरकारचा नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी विरोधकांचा प्लॅन! प्रियांका गांधींनी लगेचच केली सुरुवात

दरम्यान, काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला असून या पत्रातून २०२३ मध्ये पारित करण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसंच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. यावेळी भाजपकडून विरोधकांविरोधात प्रचार करण्यात येणार असल्यानं त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण काय करावं? याबाबत आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय घेऊ असंही प्रियांका गांधी यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com