विधान परिषदेच्या जागांसाठी तीन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच !

भाजपला सभागृहात बहुमत मिळविण्याची संधी आहे
Congress-BJP
Congress-BJPSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : हनगल आणि सिंदगीच्या पोटनिवडणुकीचा धुरळा ओसरण्यापूर्वीच डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या २५ जागांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. विधान परिषदेत सध्या कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, परंतु या निवडणुकीकडे भाजपला सभागृहात बहुमत मिळविण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे, तर धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) त्यांच्या जागा टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. धजद सदस्याची संख्या अलीकडच्या काळात कमी होत आहे. (Political activity increased in all three parties for 25 seats in the Legislative Council)

५ जानेवारी २०२२ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून आलेल्या कॉंग्रेस, भाजप व धजद या प्रमुख तिन्ही पक्षांमधील काही ज्येष्ठ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या ७५ सदस्यांच्या सभागृहात भाजप ३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसकडे २९ आणि धजदचे (सभापतींशिवाय) १२ सदस्य आहेत. एक अपक्ष सदस्य आहे. निवृत्त होणाऱ्या २५ सदस्यांपैकी काँग्रेसचे श्रीनिवास माने हे हनगलमधून नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विधानसभेवर निवडून आले आहेत.

Congress-BJP
अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याची धुरा सोपवली दोन वर्गमित्रांवर!

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नसल्या तरी पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. रविवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याच विषयावर बैठक घेऊन चर्चा केली. परिषदेतील आपल्या जागा राखण्याबरोबरच सभागृहात बहुमत मिळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी कॉंग्रेसने रणनीतींवर चर्चा केल्याचे समजते. दुसरीकडे भाजपने १९ नोव्हेंबरपासून ग्रामपंचायत सदस्य, विधानसभा आणि परिषद सदस्य आणि खासदारांचा समावेश असलेल्या ‘जन स्वराज’ यात्रेची घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीची तयारी, हेच या यात्रेचे उद्दिष्ट आहे. उमेदवारांची यादी येथे शॉर्टलिस्ट केली जाईल परंतु केंद्रीय नेतृत्व अंतिम करेल, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस एन. रविकुमार यांनी रविवारी सांगितले.

Congress-BJP
मुख्यमंत्री ठाकरे ज्यांना विसरले ते निघाले पंतप्रधान मोदींचे मित्र!

जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींची मुदत संपलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका व जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन्ही स्वराज संस्थांच्या सदस्यांची विधान परिषद निवडणुकीत मते नसणार आहेत. या बदलामुळे विधान परिषद निवडणुकीतील मतदानावर परिणाम होणार असून या निवडणुकीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महत्त्वाचे ठरणार आहेत. धजदचे तीन सदस्य संदेश नागराज, कंथाराज आणि सी.आर. मनोहर हे पक्ष सोडणार असल्याचे समजते. नागराज आणि मनोहर यांनी तिकिटासाठी भाजपशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळाली आहे.

Congress-BJP
अरे वेड्या, भाजपला गाडण्याची वल्गना करण्यापेक्षा आधी तुझं नाचगाणं बंद कर : फडणवीसांचा मुंडेंना टोला

हनगलमध्ये मनोबल वाढवणाऱ्या विजयावर स्वार होऊन काँग्रेस आपल्या जागा राखण्यासाठी आणि सभागृहात आपली संख्या वाढवण्याची रणनीती आखत आहे. सध्या सभागृहातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असूनही ते काही महत्त्वपूर्ण विधेयके रोखू शकले नाहीत. कारण धजदने एकतर विधेयक मंजूर केले जात असताना सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला किंवा बहिष्कार घातला. अप्रत्यक्षपणे भाजप सरकारला मदत केली, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत चर्चा सुरू झाली असली तरी संभाव्य उमेदवारांची यादी नंतर जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com