Hit And Run: व्हायरल 'बाईक रायडर' तरुणीच्या 'हिट अँड रन' प्रकरणी राजकीय कनेक्शन आलं समोर! आरोपी तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर

Hit And Run: या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये पीडित महिलेच्या डोक्यावर हेल्मेट असल्यानं ती वाचली.
Delhi Gurugram Hit and Run Case
Delhi Gurugram Hit and Run Case
Published on
Updated on

Hit And Run: दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या गुरुग्राममधील एका बाईक रायडर तरुणीच्या 'हिट अँड रन' प्रकरणी आता राजकीय कनेक्शन समोर आलं आहे. पडीत तरुणी शिवानी चौहान ऊर्फ सिया हीच्या बाईकला बाजुनं जोरदार धडक देऊन एक कार चालक पळून गेला होता. तरुणीनं डोक्यात हेल्मेटसह सुरक्षेच्या गोष्टी परिधान केल्यानं ती अपघातातून थोडक्यात वाचली. पण या 'हिट अँड रन' प्रकरणाचा व्हिडिओ या बाईकवरील कॅमेरॅतच कैद झाला आहे. या पीडित महिलेनं ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेटसमोर आपला जबाब दिला यात अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी घटनेवेळी कारमध्ये बसलेल्या चार लोकांपैकी दोघांना अटक केली आहे. यामध्ये एकाचं नाव कल्याण बैंसला आणि त्याचा भाऊ यांचा समावेश आहे. ज्या बाईकला या आरोपींना धडक दिली त्या शिवानी चौहान हीनं बीएनएनएस कलम १८३ अंतर्गत ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. शिवानीचे वडील रोशन चौहान हे आम आदमी पार्टीच्या ट्रेड विंगचे सदस्य आहेत. रोशन यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी अद्याप या घटनेतून सावरलेली नाही. तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, याप्रकरणी आपल्याला केवळ बातम्या आणि सोशल मीडियातूनच माहिती झाली. शिवानी देखील आम आदमी पार्टीच्या युथ विंगची सदस्या आहे.

Delhi Gurugram Hit and Run Case
Local body election 2026 : काँग्रेसपेक्षा 566 नगरसेवक अधिक, पण तरीही भाजपला मोठा धक्का; निवडणूक निकालाने वाढविले टेन्शन

शिवानीनं निवडणूकही लढवलीए

शिवानीनं आम आदमी पार्टीच्या तिकीटावर कालकाजी वॉर्डमधून २०२२ मध्ये दिल्ली नगर निगमची निवडणूक लढवली होती. शिवानीनं फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझाईनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शिवानीनं सांगितलं की, मी अजूनही या धक्क्यामध्येच आहे. रात्रभर ही घटना माझ्या डोक्यात घुमत होती. मी आता काही काळ बाईकिंगपासून ब्रेक घेणार आहे. रस्ते महिलांसाठी तितकेच असुरक्षित असतील जितके रविवारी होते. आता मी बाईकिंगसाठी घराबाहेर पडताना विशेषतः एकटं बाहेर पडताना १०-१२ वेळा विचार करेन.

पीडिता पुढे काय करणार?

शिवानीनं पुढे असंही म्हटलं की, माझा हेतू अशा प्रकरणांमध्ये न्यायाच्या प्रक्रियेचा वेग वाढवणं हा आहे. तसंच हे निश्चित करणं आहे की, पोलीस आणि कोर्टानं दोषींना शिक्षा दिली पाहिजे. ही घटना आठवताना शिवानीनं सांगितलं की, कारमध्ये बसलेले सर्व लोक हे अश्लील इशारे करत होते त्यानंतर त्यांच्या कारनं माझ्या बाईकला टक्कर दिल्यानंतर जेव्हा मी खाली पडले तेव्हा ते माझ्यावर हसतही होते. सर्वजण एकसारखेच हावभाव करत होते. एकानही मागे वळून पाहिलं नाही की मला लागलंय किंवा मी जिवंत तरी आहे का? या कारमध्ये चार लोक होते. इतर दोघांना मी टिंटेड ग्लासमुळं (काळी काच) पाहू शकले नाही. ही माझी चूक नाही, माझे हात-पाय अद्यापही दुखत आहेत.

Delhi Gurugram Hit and Run Case
Uddhav Thackeray : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ठाकरेंचा सरकारविरोधात एल्गार; मराठवाडा अनुशेषाचं आंदोलन पेटणार?

महिला आयोगाकडून दखल

हरयाणाच्या राज्य महिला आयोगानं या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. तसंच पोलिसांना निर्देश दिले की, महिला आणि त्याच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारे धमकी, दबाव किंवा छळाचा सामना करावा लागू नये.

कोण आहे आरोपी?

'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपी कल्याण बैंसला हा फिटनेस, बॉडी बिल्डिंगचा चाहता असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरुन समोर आलं आहे. तसंच तो स्वतःला आंतरराष्ट्रीय कब्बडी खेळाडू असल्याचं सांगतो तसंच भारतीय रग्बी टीमचा खेळाडू असल्याचंही सांगतो आहे. तसंच त्यानं आजवर अनेक बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धाही खेळल्याचं त्यांनं सोशल मीडियावर म्हटलं आहे. तो मूळचा पहलवान असून स्वतःची जिम चालवतो. गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर त्यानं एका बाईक रायडर महिलेला मुद्दाम धडक देऊन पळून गेल्यानंतर त्यानं आपली ओळख समोर येऊ नये यासाठी स्वतःच इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com