Delhi CM Rekha Gupta
Delhi CM Rekha GuptaSarkarnama

राहुल गांधीचे आरोपही भाजपला मान्य? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाल्या, "आम्ही ईव्हीएम हॅक केलं..."

Rekha Gupta on EVM : दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा भाजप नेत्या रेखा गुप्ता यांच्या एका वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेस वाल्यांनी 70 वर्षांपासून ईव्हीएम हॅक केलं असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published on
Summary
  1. दिल्लीच्या मुख्यमंत्री व भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

  2. त्यांनी म्हटलं की काँग्रेस ७० वर्षांपासून ईव्हीएम हॅक करत आली आहे.

  3. "आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय," या वक्तव्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

New Delhi News : लोकसभेचे विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून वोट चोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर आरोप केले आहेत. तसेच ईव्हीएमबाबतही संशय व्यक्त करत निवडणुक आयोगावर देखील तिखट टीका केली आहे. यादरम्यान आता त्यांच्या आरोपांना खतपाणी घालणारे वक्तव्य भाजप नेत्या तथा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले आहे. यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. रेखा गुप्ता यांनी “आम्ही ईव्हीएम हॅक केलं तर विरोधकांना (काँग्रेस) वाईट वाटतंय”, असं वक्तव्य केलं आहे. यामुळे राहुल गांधी यांच्याकडून होणारे सततचे आरोप भाजप नेत्याला मान्य आहेत की काय? अशा चर्चा आता सुरू झाली आहे.

काँग्रेस लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या मतदारांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर आरोप करताना दिसत आहेत. वोट चोरीच्या मुद्द्यावरून आरोप करताना, राहुल गांधींनी, ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलता येऊ शकतो, असा आरोप केला होता. तर याच मार्गाने भाजपने वोटी चोरी करून सत्ता मिळवल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात अशू मागणी ही केली आहे. मात्र हे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत.

अशातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी, आम्ही ईव्हीएम हॅक केलं, त्यामुळे विरोधकांना वाईट वाटतंय असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांचे या वक्तव्यामुळे राहुल गांधीचे आरोप भाजपला मान्य आहेत असाच अर्थ निघत असल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे.

Delhi CM Rekha Gupta
Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ, यावेळी...; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नुकताच एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीवेळी त्यांनी, विरोधक दावा करत आहेत की ईव्हीएमच्या कृपेने भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (भाजपची विद्यार्थी शाखा) आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत. निवडणूक आयोगही आमच्या बाजूने आहे. मात्र गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेस आणि विरोधक हे ईव्हीएम हॅक करतच आले होते. त्यावेळी त्यांना काही फरक पडत नव्हता, आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटंतंय.

याविधानानंतर आता आपने देखील आरोप केले असून माजी मुख्यमंत्री तथा आप नेते अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. जो रेखा गुप्ता यांच्या वक्तव्याचा असून “दिल्ली भाजपच्या नेत्या काय म्हणतायत एकदा बघा”, असे म्हटलं आहे.

दरम्यान या वक्तव्यावरून समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत असून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काँग्रेसवर केलेले आरोपात तथ्य नसल्याचे एका युजरने म्हटलं आहे. एका एक्स युजरने, रेखा गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस 70 वर्षांपासून ईव्हीएम हॅक करत आलं आहे. मात्र, पूर्वी भारतात निवडणुका ईव्हीएमवर होत नव्हत्या.” भारतात 2004 पासून आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका या ईव्हीएमवर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. 2004 च्या आधी भारतात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या जात होत्या.

Delhi CM Rekha Gupta
CM Rekha Gupta Attack: CM रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे गुजरात कनेक्शन

FAQs :

1. रेखा गुप्ता कोण आहेत?
त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या आहेत.

2. त्यांनी काँग्रेसवर कोणता आरोप केला?
काँग्रेस ७० वर्षे ईव्हीएम हॅक करत आली असल्याचा.

3. त्यांचं वक्तव्य काय होतं?
"आम्ही ईव्हीएम हॅक केलं तर त्यांना वाईट वाटतंय."

4. या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या?
राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

5. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर झाला?
ईव्हीएम निवडणुकीतील गैरव्यवहाराच्या चर्चेमुळे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com