Delhi News: मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात महत्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर विरोधक देखील अलर्ट झाले असून काँग्रेसकडून विशेष अधिवेशनासाठी आपल्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात काही महत्वाचे विधेयकं सरकार आणण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून या अधिवेशन काळात सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.
संसदेच्या या विशेष अधिवेशनात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांतील भारताच्या कामगिरीपासून ते संविधान सभेपर्यंत अशा विविध बाबींवर चर्चा होणार असल्याचा सरकारचा या अधिवेशनाचा अजेंडा बुधवारी समोर आला. यानंतर विरोधक या अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने या अधिवेशनावर बहिष्कार न टाकता उपस्थित राहण्याची रणनीती आखली आहे.
या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार चार महत्वाचे विधेयकं सभागृहात मांडणार असल्याची चर्चा आहे. मात्र, हे चार विधेयकं नेमकी कोणते आहेत, याबाबत सध्या तरी सविस्तर माहिती समोर आलेली नसल्याने काँग्रेस अलर्ट झालं असून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. याच अनुषंगाने सर्व खासदारांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.