Vande Mataram: वंदे मातरम् वरुन राजकीय घमासान, काँग्रेसचा मोठा दावा! भाजप-RSS च्या शाखांमध्ये...

Vande Mataram: भारताचं राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
BJP-RSS
BJP-RSSSarkarnama
Published on
Updated on

Vande Mataram: भारताचं राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं तर राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरमचं गायनं आता बंधनकारक केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी वंदे मातरम् हे गीत आपल्या धार्मिक राष्ट्रीयत्वाचं प्रारुप मानलं आहे. त्यामुळं यंदा केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारनं सेलिब्रेशन सुरु केलं आहे. पण यामुळं आता याला राजकारणाची फोडणी देखील मिळाली आहे. काँग्रेसनं RSS-भाजपवर निशाणा साधताना ते कसे दुटप्पी वागत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसनं कसं कायम या गीताला आपल्या कारभाराचा भाग बनवलं आहे, हे ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP-RSS
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले; ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्टला तयार!

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधताना म्हटलं की, "या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्आतील हे एक लोकप्रिय घोषवाक्य असतानाही त्यांनी कधीही आपल्या कार्यालयांमध्ये, शाखांमध्ये आणि आपल्या पत्रकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये 'वंदे मातरम'चा समावेश केला नाही. भारताच्या या राष्ट्रीय गीताऐवजी आरएसएसला 'नमस्ते सदा वत्सले' नामक एक म्युजिकल गाणं आवडतं. काँग्रेसच्या परंपरांशी तुलना केल्यास १९८६ पासून आजवर काँग्रेसच्या प्रत्येक मिटींगमध्ये नेत्यांकडून वंदे मातरम गायलं जातं. मग ती स्थानिक स्तरावरची बैठक असो किंवा ब्लॉक लेवलची बैठक असो"

BJP-RSS
Congress News : पृथ्वीराज चव्हाणांना निकटवर्तीयाने दाखविला कात्रजचा घाट; काँग्रेसचा राजीनामा, भाजपप्रवेश निश्चित

भाजप-आरएसएसनं 'वंदे मातरम' गायल नाही - काँग्रेस

वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, "ही खूपच अजब गोष्ट आहे की, जे लोक आज स्वतःला राष्ट्रीयत्वाचे स्वघोषित संरक्षण म्हणवून घेतात. RSS आणि BJP ने कधीही आपल्या शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये 'वंदे मातरम' हा राष्ट्रीय गीत आणि 'जन गण मन' हे राष्ट्रगीत कधीही गायलं नाही. उलट 'नमस्ते सदा वत्सले' हे गात असतात. यातून देशाचं नव्हे तर केवळ त्यांच्या संघटनेचं कौतुक केलेलं आहे. १९२५ मध्ये संघाची स्थापना झाल्यानंतर RSS नं वंदे मातरम या गीतापासून दूर राहणं पसंद केलं. त्यांच्या अधिकृत पत्रकांमध्ये किंवा पुस्तकांमध्येही एकदाही या गीताचा उल्लेख झाल्याचं ऐकिवात नाही"

BJP-RSS
Manoj Jarange on Dhananjay Munde : मनोज जरांगेंनी टाकला 'ऑडिओ क्लिप बॉम्ब'; दीड-दोन कोटी, धनंजय मुंडे अन्...

संघानं कायम इंग्रजांना साथ दिली - खर्गे

खर्गे यांनी पुढे म्हटलं की, "जेव्हा आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत या गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी एक पोस्टाचं तिकीटंही प्रकाशित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील बिहारच्या पाटणा शहरातील एका कार्यक्रमात सहभागी झाले. याठिकाणी त्यांनी वर्षभर चालवल्या जाणाऱ्या एका कॅम्पेनची घोषणा केली. दरम्यान, खर्गे म्हणाले, हे सर्वश्रृत आहे की RSS आणि संघ परिवार यांनी राष्ट्रीय चळवळीत भारतीयांच्याविरोधात इंग्रजांना साथ दिली. ५२ वर्षांपर्यंत राष्ट्रध्वज फडकवण्यालाही मनाई केली होती. संविधानाचा अपमान केला, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळेही जाळले. सरदार पटेल यांच्या शब्दांत सांगायचं तर गांधीजींच्या हत्येमध्ये सहभागी होते"

BJP-RSS
Nashik NMC Election : आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदेंकडे दुर्लक्ष, शंभर प्लस'साठी भाजपचा पहिलवान आमदारावरच विश्वास

काँग्रेसच्या परंपरांशी तुलना करताना खर्गे म्हणाले, "काँग्रेस पक्षाला 'वंदे मातरम' आणि 'जन गण मन' या दोन्ही गीतांचा खूप गर्व वाटतो. ही दोन्ही गाणी काँग्रेसच्या प्रत्येक सभेत आणि कार्यक्रमांत सन्मानानं गायले जातात. जे भारताची एकता आणि गौरवाचं प्रतिक आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com