Nashik NMC Election : आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदेंकडे दुर्लक्ष, शंभर प्लस'साठी भाजपचा पहिलवान आमदारावरच विश्वास

BJP trusts Rahul Dhikle for Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ढिकलेंच्या नेतृत्वात निवडणूक होईल.
Seema Hire, Devyani Farande
Seema Hire, Devyani FarandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा येऊ घातल्याने भाजपला महापालिकेवर कोणत्याही परिस्थिती सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. स्वबळावर शंभरहुन अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी पदी अपेक्षे प्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक महापाालिका निवडणुकीची जबाबदारी शहरात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व ढिकले यांच्या नेतृत्वातच नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

मात्र या निमित्ताने शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे व पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे या दोन्ही महिला आमदारांकडे भाजप नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. ॲड. ढिकले यांच्या माध्यमातून नवीन चेहऱ्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडून महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता आणून दाखवू असा विश्वासही ढिकले यांनी व्यक्त केला आहे.

Seema Hire, Devyani Farande
Rajabhau Waje : मनपाच्या वाटेत आता राजाभाऊ वाजे आडवे, बी. डी. भालेकर शाळेच्या जागी विश्रामगृह बांधण्यावरुन आक्रमक

शहरातील उर्वरित दोन्ही आमदारांना आपल्या पुढच्या पिढीला महापालिकेच्या आखाड्यात उतरवत त्यांचे राजकीय करिअर सेट करायचे आहे. याशिवाय अन्य समर्थक व कार्यकर्त्यांनाही उमेदवारीचे शब्द या आमदारांनी दिले आहेत. त्या दृष्टीने पक्षाने जाणीवपूर्वक अॅड राहुल ढिकले यांची नियुक्ती केल्याचे दिसते.

याशिवाय भाजपने नाशिक महापालिकेतील शंभर प्लसचे उदि्ष्ट घाठण्यासाठी अनेक वादग्रस्त नेत्यांना पक्षप्रवेश दिले आहेत. या नेत्यांशी वैर नसेल किंवा त्या सर्वांशी सूत्र जुळू शकेल अशा चेहऱ्याकडे भाजप नेतृत्वाने निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याचे दिसते. कारण, पश्चिम मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचा विरोध डावलून मंत्री गिरीश महाजन यांनी काही प्रवेश घडवून आणले होते. विशेषत: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून आलेल्या सुधाकर बडगुजर यांचा त्यात समावेश होता.

Seema Hire, Devyani Farande
Devendra Fadnavis Politics : फडणवीस शब्द विसरले, मंत्रीपदाचा शब्द दिलेल्या आमदाराला केलं थोडक्यात खूश..

दरम्यान ढिकले यांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे, कारण शंभर प्लसचा भार त्यांच्या खांद्यावर असणार आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात ते सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नाशिक महापालिकेत नगरसेवक व स्थायी समिती सभापती ते राहिले आहेत. पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी व संघटनात्मक पातळीवरील अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडे नाशिकची धुरा सोपवली आहे. तसेच नाशिकमध्ये २०२६- २७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा देखील त्यांच्याच मतदारसंघात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com