Bihar Politics : तेजप्रतापनंतर चिराग पासवान यांचा तोफगोळा! विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय, नितीश कुमारांचे काय होणार?

Chirag Paswan's Decision to Contest Bihar Assembly Elections : थेट चिराग पासवान यांनाच निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे समजते. त्यासाठी अद्याप कोणताही मतदारसंघ निश्चित करण्यात आलेला नाही.
Chirag Paswan, Nitish Kumar
Chirag Paswan, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

LJP's Strategic Positioning in Bihar Politics : बिहारच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही आघाडी घेतली आहे. त्यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

थेट चिराग पासवान यांनाच निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे समजते. त्यासाठी अद्याप कोणताही मतदारसंघ निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र, बिहारच्या राजकारणासाठी ही महत्वाची घडामोड मानली जात आहे. प्रामुख्याने संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांची भेट घेतली होती. आपला पक्ष एनडीएमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढेल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपकडून अद्याप त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विरोधी पक्षांकडून नितीश कुमारांच्या प्रकृतीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Chirag Paswan, Nitish Kumar
Ajit Pawar News : अजित पवारांना सर्वात मोठा झटका; 7 आमदारांनी सोडली साथ, ‘या’ राज्यात पक्ष फुटला...

लोकसभा निवडणुकीत चिराग यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले होते. यापार्श्वभूमीवर पक्षाने विधानसभा निवडणुकीतही अधिकाधिक जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपसाठीही चिराग यांच्या पक्षाला अधिकाधिक जागा मिळाल्यास फायद्याचे ठरणार आहे. सत्तेसाठी नितीश कुमार यांची गरज लागू नये, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.

नितीश कुमार यांना टक्कर देण्यासाठी चिराग पासवान यांना ताकद देण्याची भाजपची रणनीती असू शकते. यापार्श्वभूमीवर चिराग यांनी निवडणूक लढविण्याबाबतचा ठराव त्यांच्या पक्षाच्या बैठकीत पारित करण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केल्यास चिराग पासवान यांच्याकडून तो टाळला जाणार नाही, असे दिसते. ते निवडणुकीत उतरल्यास पक्षाला मोठा जनाधार मिळेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांना वाटत आहे.

Chirag Paswan, Nitish Kumar
Tej Pratap Yadav News : लालू झोपेत असतानाच थोरल्या लेकाचा पहिला ‘पॉलिटिकल स्ट्राईक’

चिराग यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयावर नितीश कुमार यांच्या पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा म्हणाले, प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. हा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. चिराग यांनी नितीश कुमारांना आपले नेते मानले आहे. त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाने या घडामोडीला एनडीएतील वाद म्हटले आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्यूंजय कुमार तिवारी म्हणाले, लवकरच एनडीएतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला दिसेल. एनडीएतील नेत्यांमध्ये नेतृत्वासाठी महत्वाकांक्षा वाढली असून त्याचाच हा परिणाम आहे. चिराग पासवान यांनी निवडणूक लढली तरी तेजस्वी यादव यांना काही पडत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com