Kareena Kapoor: करीना कपूरच्या पेंडंटवरुन पेटलं राजकारण! काँग्रेसच्या नेत्याचा आक्षेप, अभिनेत्रीला थेट नोटीसच धाडली

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री आणि भोपाळच्या नावाबाच्या खानदानाची सून करीन कपूर खान हीनं नुकतेच दिवाळी सेलिब्रेशन दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण तिच्या या फोटोंवरुन नवा वाद पेटला आहे.
Kareena Kapoor with Nawabi Pendent
Kareena Kapoor with Nawabi PendentSarkarnama News
Published on: 
Updated on: 

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री आणि भोपाळच्या नावाबाच्या खानदानाची सून करीन कपूर खान हीनं नुकतेच दिवाळी सेलिब्रेशन दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण तिच्या या फोटोंवरुन नवा वाद पेटला आहे. याचं कारण ठरलंय तिनं गळ्यात घातलेलं एक पेंडंट! तिनं गळ्यात घातलेलं हे पेडंट त्यांच्या नवाबी कुटुंबातील सुमारे २०० वर्षांपूर्वीचं खानदानी पेंडंट आहे. या पेडंटवर काँग्रेसच्या एका नेत्यानं आक्षेप घेतला असून करीनाला थेट नोटीसच पाठवली आहे.

नेमका विषय काय?

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अब्बास हफीज यांनी या प्रकरणात करीनाच्या पेंडंटवर आक्षेप घेतला असून तिला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. या आक्षेपाचं कारण सांगताना हफीज यांनी माध्यमांना सांगितलं की, करीना कपूरनं नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिनं भोपाळच्या शाही कुटुंबातील काही आभुषणं घातले आहेत. खरंतर हा त्यांचा अधिकार आहे की त्यांना जे वाटेल ते त्यांनी घालावं. पण त्यांच्या फोटोजमध्ये त्यांनी गळ्यात घातलेलं एक पेडंट दिसतं आहे. त्यामध्ये मुस्लिमांचं सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या कुरआनमधील आयत लिहिलेली आहे. हे पेंडंट भोपाळच्या शाही बेगमशी संबंधित आहे. २०० वर्षांपूर्वी हे पेंडंट त्यांच्या धार्मिक आस्थेसाठी बनवण्यात आलेलं असावं. त्याचं एक धार्मिक महत्वं आहे, पण या पवित्र अक्षरांचं अशा प्रकारे प्रदर्शन करणं चुकीचं आहे.

मुस्लिमांच्या भावना दुखावणारं

"पेंडंट घातलेले हे फोटोज मुस्लिमांच्या भावना दुखावणारे आहेत. भोपाळच्या बेगमांनी कधी अशा प्रकारे कुरानची आयत लिहिलेल्या पेंडेंटचा दिखावा केलेला नव्हता. त्यांनी कायम अस्थेनं ते वापरलं होतं. त्यामुळं आता फॅशन म्हणून ते परिधान करणं हे चुकीचं आहे. हे सगळं मुस्लिमांच्या भावना दुखावणारं आहे," असं हाफिज अब्बास यांनी म्हटलं आहे.

पाठवली नोटीस

त्यामुळं याप्रकरणी आम्ही डिमांड नोटीस पाठवून करीनाकडं ही मागणी केली आहे की, त्यांनी सोशल मीडियावरील आपले फोटो डिलीट करावेत. तसंच त्यांनी या कृत्यासाठी खेद व्यक्त करावा. पण तरीही त्यांनी फोटोज हटवले नाहीत तर आमचे वकील आणि लिगल टीम या प्रकरणात कायदेशीर प्रकरण म्हणून लक्ष घालू, असा इशाराही यावेळी हाफिज अब्बास यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.