BJP Meghalaya news : राजकारणात पुन्हा भूकंप; भाजप मित्रपक्षालाच खिंडार पाडणार? 13 आमदार विलीनीकरणाच्या तयारीत...

Meghalaya BJP, UDP MLAs, TMC : मेघालयात यूडीपी-तृणमूल आमदारांचा भाजपकडे कल; १३ आमदारांच्या संभाव्य प्रवेशाने सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

United Democratic Party : देशाच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. मेघालयातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. या पक्षाच्या विद्यमान नऊ आमदारांसह तृणमूल काँग्रेसचे राज्यातील सर्व चार आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक आघाडीचे सरकार आहे. यूडीपीसह भाजपही या आघाडीत आहे. एकाचवेळी १३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा पक्ष आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरेल. सध्या १२ आमदारांसह UDP हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सहयोगी पक्ष आहे.

राज्यात भाजपचे सध्या केवळ दोनच आमदार आहेत. १३ आमदारांच्या विलीनीकरणानंतर हा आकडा १५ वर पोहोचणार आहे. NPPचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचा पक्ष ३३ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. यूडीपीच्या काही आमदारांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

BJP
MP resignation news : पक्षाच्या अध्यक्षांनी दिलेलं आव्हान खासदारानं स्वीकारलं; थेट राजीनाम्याची तारीखच जाहीर केली, पक्षालाही रामराम ठोकणार...

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी यूडीपीचे आठ तर तृणमूलचे तीन आमदार एकाचवेळी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यानुसार आमदारांची जुळवाजुळव केली जात असल्याचे वृत्त आहे. तृणमूलमधील माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा हेही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यूडीपीच्या आमदारांनी FCRA कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी शहांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, या भेटीमागे विलीनीकरण हा महत्वाचा मुद्दा होता, अशी चर्चा आहे.

यूडीपीतील आमदार पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. तेव्हापासूनच हे आमदार स्वतंत्र गट करून भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रयत्न करत असल्याची चर्चा मेघालयच्या राजकीय वर्तुळात आहे. तर पश्चिम बंगालमधील सत्ता केल्यानंतर तृणमूल काँग्रेसही बॅकफूटवर गेली असून मेघालयातील चारही आमदार सत्तेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.

BJP
Rahul Gandhi news : राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रख्यात महिला IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; भाजप नेत्याकडून गंभीर आरोप

तृणमूल काँग्रेसचे बंगालमधील २० खासदार निवडणुकीनंतर एनसीपीआयमध्ये विलीन झाले आहेत. सुमारे ६० हून अधिक आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्याआधी आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार भाजपमध्ये विलीन झाले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. त्यानंतर आता यूडीपीही त्याच मार्गावर असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com