PM of India : मोदींच्या निवृत्तीनंतर कोण? सर्व्हे सोडा, काँग्रेस नेत्यांचीही पंतप्रधान पदासाठी भाजपमधील ‘या’ नावाला पसंती

PM Modi's Retirement Timeline : वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांना भाजपमध्ये राजकीय निवृत्ती दिली जाते, असे संकेत आहेत. मागील काही वर्षांत अनेक बड्या नेत्यांबाबत हेच घडले आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

India’s Leadership Transition : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील काही दिवसांत ७५ वर्षांचे होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच निवृत्तीबाबत सूचक विधान केले आहे. त्यांच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबाबत चर्चा झडू लागल्या आहेत. विविध सर्व्हे पुढे येत असून त्यामध्ये मोदींनंतर पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांना भाजपमध्ये राजकीय निवृत्ती दिली जाते, असे संकेत आहेत. मागील काही वर्षांत अनेक बड्या नेत्यांबाबत हेच घडले आहे. त्यामुळे आता मोदींनंतर कोण, या प्रश्नाचे उत्तर एका सर्व्हेमधून समोर आले होते. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांना पहिला, दुसरा, तिसरा या क्रमानुसार पसंती मिळाली होती.

काँग्रेस नेत्यांनाही मोदींनंतर कोण, या प्रश्नाबाबत मोठी उत्सुकता आहे. एका आमदाराने थेट नितीन गडकरी यांचे नाव घेत, तेच पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्णा यांनी उघडपणे गडकरींच नाव घेतले आहे. पीएम मोदीनंतर नितीन गडकरी यांना पुढचे पंतप्रधान बनवायला हवे, असे ते म्हणाले आहे.

Narendra Modi
PM Modi’s Strategy : 30 व्या वर्षीच दोन्ही पाय तोडले, तरीही लढले! पंतप्रधान मोदींचा विधानसभेसाठी 'मास्टर'स्ट्रोक

गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य निवड आहे. गडकरींना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता आहे. देशात गरीब लोकांची संख्या वाढत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. देशातील पैसा काही लोकांच्या हातात जात आहे. ही स्थिती पाहिल्यास गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य आहेत. भाजप हायकमांडने याविषयी विचार करायला हवे, असे आमदार बेलूर म्हणाले आहेत.

Narendra Modi
Modi Government : आता निवडणूक लढणार नाही! पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांनी वर्षभरातच केली धक्कादायक घोषणा

दरम्यान, बेलूर यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे नाव घेत म्हटले की, भाजपने 75 वर्षे पूर्ण झालेल्या येडियुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्या डोळ्यांत त्यावेळी पाणी आले होते. भाजपने सरसंघचालकांच्या इच्छेचा मान राखत हा फॉर्म्यूला पंतप्रधान पदासाठीही लागू करायला हवा, असेही बेलूर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com