‘द कश्मीर फाइल्स’ वरुन AAPच्या कार्यालयाबाहेर भाजपची पोस्टरबाजी

आम आदमी पार्टीच्या (AAP)कार्यालयासमोर एक फलक लावण्यात आला. हा फलक सध्या चर्चेत आहे.
aap headquarter
aap headquartersarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 'द कश्मीर फाइल्स'वर केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे, ‘द कश्मीर फाइल्स’या चित्रपटाची कहाणी खोटी असल्याचे विधान अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यानंतर काश्मिरी पंडितांची चेष्टा करणारे केजरीवाल चांगलेच अडचणीत आले आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपच्या (bjp)कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा आणला होता. एक मोर्चा भाजपयुवा मोर्चाचा होता तर दुसरा मोर्चा हा 'india 4 kashmir'यांनी काढला होता. त्यानंतर बुधवारी रात्री आम आदमी पार्टीच्या (AAP)कार्यालयासमोर एक फलक लावण्यात आला. हा फलक सध्या चर्चेत आहे.

aap headquarter
ED कारवाई हा चिंतेचा नव्हे गमतीचा विषय ; पटोलेंवर छापा पडला तरी आश्चर्य नाही!

दिल्ली भाजपचे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी हा फलक लाववला आहे, ऐका, केजरवाल, तुम्ही खोटा चित्रपट ज्याला म्हणतात, तो आमचा दु:खदायक इतिहास आहे. केजरीवाल यांनी विधानसभेत या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर आम आदमी पक्षाने आता भाजपवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तोडफोडीचे आदेश दिले होते का?, असा आरोप आपच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे.

aap headquarter
अभिनेत्री रिमी सेनेला चार कोटींचा गंडा ; व्यावसायिकाविरोधात गुन्हा

आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. या निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. याबाबत आप नेते राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे की, पंजाबमधील पराभवानंतर भाजपाला धक्का बसला आहे. ते म्हणाले- “माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपाच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांच्या उपस्थितीत या गुंडांनी बॅरिकेड्स तोडले, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com