Arvind Kejriwal: दोन जूनपासून केजरीवालांचा मुक्काम पुन्हा तिहार जेलमध्ये? सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

Arvind Kejriwal Petition: केजरीवाल यांचा अंतरिम जामीन १ जून रोजी संपत असल्याने त्यावर बुधवारी सुनावणी झाली पाहिजे. प्रकृतीच्या कारणास्तव केजरीवाल यांनी जामिनाला एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
Supreme Court, Arvind Kejriwal
Supreme Court, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 28 May : आपचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने पुन्हा झटका दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जामीन वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी केली होती. त्यांच्या जामिनाच्या (Interim Bail) याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवालांना दोन जून रोजी पुन्हा तिहार जेलमध्ये जावे लागणार असल्याचे दिसते.

Supreme Court, Arvind Kejriwal
Shinde Group Politics: खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

केजरीवाल यांच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी त्यांनी अर्ज केला आहे. त्याचा अंतरिम जामीन १ जून रोजी संपत असल्याने त्यावर बुधवारी सुनावणी झाली पाहिजे. प्रकृतीच्या कारणास्तव केजरीवाल यांनी जामिनाला एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना सरन्यायाधीशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

तिहार जेलमध्ये सात किलो वजन कमी झाले असल्याचा दावा केजरीवालांनी यापूर्वी केला आहे. जामीन मिळाल्यानंतर आरोग्य तपासणी केली जात असून किटोन लेव्हल वाढल्याचे समोर आले आहे. अंतरिम जामीनाची मुदत सात दिवसांनी वाढवावी, अशी विनंती केजरीवालांनी याचिकेत केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चौकशी पूर्ण झाल्यानंतर ९ जून रोजी आपण हजर राहणार करणार असल्याचे केजरीवाल यांच्यावतीने न्यायालयाला सांगितले आहे. प्रकृती बरी नसल्याने जेलमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये आणि आपल्या आरोग्याला आणि जीवाला होणारे संभाव्य दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

केजरीवाल यांनी आरोग्य तपासणीसाठी पाच ते सात दिवसाची गरज आहे. त्यांना जामिन मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्य प्रचारात व्यग्र असल्यामुळे आरोग्य तपासणी झालेली नाही, असे केजरीवाल यांनी आपल्या अर्जात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com