Prashant Kishor : लोकसभा निवडणूक निकालावर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Prashant Kishor on Loksabha Election Result : लोकसभा निवडणूक निकालाबाबत प्रशांत किशोर यांनी केलेल भाकीत पूर्णपणे चुकीचं ठरेलंल आहे, जाणून घ्या आता नेमकं काय म्हणाले आहेत
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama

Prashant Kishor Politics News : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी मान्य केलं की, लोकसभा निवडणुकीबाबत त्यांचा अंदाज चुकुचा होता. जन सुराज पक्षाचे संस्थापक असलेल्या प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, होय मी मानतो की, माझा अंदाज आणि अन्य एक्झिट पोल चुकीचे ठरले.

4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी अंदाज वर्तवला होता की, भाजपच्या जागांची संख्या ही 2019च्या 303 जागांच्या आसपास किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकते. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तो एक्झिट पोल व प्रशांत किशोर यांच्या अंदाजाच्या पूर्णपणे विरुद्ध ठरला. कारण, सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला साडेतीनशे पेक्षा अधिक जागा मिळतील असं दाखवलं गेलं होतं.

Prashant Kishor
Bihar Assembly Election News : प्रशांत किशोर यांची बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा, म्हणाले...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप(BJP) आणि एनडीएला मिळालेल्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले. भाजपला 240 जागांवरच समाधान मानावं लागलं तर, एनडीए आघाडी 293 जागांवर पोहचली. यामध्ये जदयू 12 आणि टीडीपीच्या 16 आणि शिवसेनेच्या 7 जागांचा अन्य मित्र पक्षांच्या काही जागांचा समावेश आहे.

Prashant Kishor
Prashant Kishor News : महाविकास आघाडीच्या जागा सांगतानाच प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

दरम्यान प्रशांत किशोर यांनी हेही सांगितले आहे की यापुढे ते निवडणुकीच्या निकालाबाबत भाकीत करणार नाही. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपच्या विजयात महत्त्वाचा रोल निभावला होता. आता प्रशांत किशोर बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूकही लढणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com