

Prateek Yadav medical treatment: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे धाकटे पुत्र प्रतीक यादव यांच्या निधनाने उत्तर प्रदेशासह देशभरात खळबळ उडाली आहे.
अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. बुधवारी सकाळी त्यांना लखनौमधील रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर नेमका कोणता आजार कारणीभूत ठरला, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
प्रतीक यादव हे गेल्या काही काळापासून फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची समस्या होती आणि त्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबईतही त्यांनी दीर्घकाळ उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बुधवारी पहाटे अचानक त्यांची तब्येत अधिक खालावली. त्यांनी प्रतिसाद देणे बंद केल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
प्रतीक यादव हे राजकारणापेक्षा फिटनेस क्षेत्रात अधिक सक्रिय होते. लखनौमध्ये त्यांचा मोठा जिम व्यवसाय होता. फिटनेस आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले होते. एकेकाळी जास्त वजन असलेल्या प्रतीक यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणला होता.
प्रतीक यादव यांनी 100 किलोपेक्षा अधिक वजन कमी करत स्वतःला फिटनेस आयकॉन म्हणून सिद्ध केले होते. त्यांच्या या प्रवासाची दखल आंतरराष्ट्रीय फिटनेस मासिकांनीही घेतली होती. फिटनेस क्षेत्रात यश मिळवूनही गंभीर आजारापुढे त्यांची झुंज अपुरी ठरली.
त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.