PM Narendra Modi Statement News
PM Narendra Modi Statement News sarkarnama

Narendra Modi : मोठा धमाका होणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज संबोधित करणार

Narendra Modi Address the Nation : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. ते नेमके कशाविषयी संवाद साधरणार याची उत्सुकता आहे.
Published on

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) सायंकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत. उद्यापासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे त्यामुळे मोदी नेमकी काय मोठी घोषणा करणार की भारत-अमेरिकेच्या तणावसंदर्भात मोठी बातमी देणार याची उत्सुकता नागरिकांना आहे.

नवरात्रोस्तवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जीएसटीमध्ये ज्या सुधारणा केल्या गेल्या आहेत त्याची माहिती देण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी नेमके कशा विषयी बोलणार याची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला भाषण करताना जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अनेक उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आला होता. जीएसटीचे दोन स्लॅब ठेवत केवळ 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी निश्चित करण्यात आला होता. 12 टक्के जीएसटी असणारी उत्पादने पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आली आहेत. तरी काही उत्पादनांवर शून्य टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

PM Narendra Modi Statement News
Nashik Politics : नाशिकला आता काही पालकमंत्री मिळत नाही, फडणवीस सरकारनेच दिले संकेत

मागील काही काळापासून भारत-अमेरिकेचे संबंध हे तणावपूर्ण झाले आहेत. अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. तसेच HB1 व्हिसाच्या नियमात बदल करून अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांचे टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आपल्या आज संध्याकाळच्या संबोधनात भाष्य करणार का? याची देखील नागरिकांना उत्सुकता आहे.

PM Narendra Modi Statement News
Maharashtra Politics Video : जयंत पाटील यांच्यावर पक्ष सोडण्याचा दबाव म्हणून पडळकर...', ठाकरेंच्या खासदाराचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com