

National News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवी प्रकरणी दिलेल्या आदेशाबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय ७ जुलै रोजी सुनावणी करणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही याचिका दाखल केली होती. यामुळे आता ७ जुलै रोजी काय फैसला होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
याचिकेत केजरीवाल म्हणाले की, "पीएम मोदींची पदवी विद्यापीठाच्या वेबसाइटवर किंवा सार्वजनिक डोमेनमध्ये इतर कोठेही उपलब्ध नाही." केजरीवालांनी याचिकेत न्यायालयाकडे निकालाचा पुनर्विचार करून आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
गुजरात विद्यापीठाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दावा केला की, पंतप्रधानांची पदवी विद्यापीठाच्या वेबसाइटवर आणि सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. केजरीवालांची याचिका मान्य केल्यानंतर न्यायाधीश बिरेन वैष्णव यांनी गुजरात विद्यापीठ, केंद्र सरकार, मुख्य माहिती आयुक्त आणि माजी सीआयसी एम. श्रीधर आचार्युलू यांना नोटीस बजावली होती.
यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने मुख्य माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द ठरवला होता आणि पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान नेरेंद्र मोदींची पदवी सादर करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.