Virat Kohli News
Virat Kohli NewsSarkarnama

Virat Kohli News : 'विराट' विक्रम रचणाऱ्या 'शतकाधीश' कोहलीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांचं खास ट्विट, म्हणाले...

Narendra Modi - Amit Shah: उत्कृष्टता आणि चिकाटीचं उदाहरण म्हणजे विराट कोहली...
Published on

Mumbai News : भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमिफायनलमध्ये तुफान फटकेबाजी करत 50 वे शतक साजरे केले. याचवेळी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रमदेखील मोडला. या विश्वविक्रमानंतर विराट कोहलीवर देशभरासह जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील कोहलीच्या विराट कामगिरीबद्दल अभिनंदन करतानाच कौतुकोद्गार काढले आहेत.

याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील कोहलीच्या विराट कामगिरीबद्दल अभिनंदन करतानाच कौतुकोद्गार काढले आहेत.

Virat Kohli News
Maharashtra Politics : महायुतीत मोठा स्फोट होणार! पवार कुटुंब एकत्र आल्याने विनायक राऊतांचं मोठं भाकीत

भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतलं हे 50 वे शतक झळकावलं आहे. या शतकानंतर क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील विराटचं कौतुक केलं आहे. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कोहलीचं कौतुक आणि अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ट्विटमध्ये म्हणतात,उत्कृष्टता आणि चिकाटीचं उदाहरण म्हणजे विराट कोहली असून, हे शब्द सर्वोत्तम क्रीडापटूची व्याख्या आहे. हा उल्लेखनीय टप्पा त्याच्या चिरस्थायी समर्पणाचा आणि अपवादात्मक प्रतिभेचा पुरावा आहे.मी विराटचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. विराटनं भावी पिढ्यांसाठी असेच मापदंड तयार करत राहोत असे पंतप्रधान मोदींनी म्हणाले आहेत.

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये 50 वं शतक झळकावण्‍याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्‍याबद्दल विराट कोहलीचं अभिनंदन. ही खेळी म्हणजे विराटच्या उत्‍कृष्‍ट खिलाडूवृत्ती, समर्पण आणि सातत्‍याची साक्ष आहे. विराटनं आपला खेळ आणखी नवीन उंचीवर न्यावा. देशाला तुझा अभिमान असल्याचे शाह म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Virat Kohli News
Rohit Pawar : कुटुंब म्हणून आम्ही एकत्र, राजकीय जीवनात आता विचाराने वेगळे; रोहित पवारांचे मोठे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com