
New Delhi: लोकसभेत पावसाळी अधिवेशनात कालपासून पुलवामा, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून चर्चा सुरू आहे. या विशेष चर्चादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही मोदी सरकारवर टीकेच बॉम्बगोळे टाकले.
काँग्रेसच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी मंगळवारी (ता.29) संसदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, कालपासून मी संसदेत सत्ताधारी पक्षांसह विविध नेत्यांची भाषण ऐकलो.आम्ही संरक्षणमंत्री यांचंही मोठं भाषण ऐकलं.त्यांनी इतिहासाचा पाठही शिकवला. पण या सगळ्या भाषणात एक गोष्ट खटकली. त्या 22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी आपल्या परिवारासमोर पर्यटकांना मारण्यात आलं. पण हा हल्ला कसा झाला, का झाला हा प्रश्न उपस्थित होतो.
प्रियांका गांधी म्हणाल्या, हे सगळे दहशतवादी या पहलगामच्या(Pahalgam Attack) बैसरन वादीत काय करत होते. आता सध्या पब्लिसिटीचा जमाना आहे. त्यामुळे केंद्रातलं सरकार आणि प्रधानमंत्री प्रचार करत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी या, तिथे जमीन खरेदी करा, तिथे व्यवहार करा. आता काश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे. तिथे सगळीकडे शांतता आहे.
पण याचदरम्यान, तिथे चार पर्यटक येतात,आणि एक तास ते एक एक करुन पर्यटकांना मारतात. यावेळी त्यांनी शुभम द्विवेदीच्या मृत्यूनंतर त्यांंच्या पत्नीच्या प्रतिक्रियेचा उल्लेख करत पहलगाममधील हल्ल्यावेळी तिथे एकही सुरक्षारक्षक का नव्हता, तिथे सैन्य का तैनात नव्हतं, पहलगाममध्ये जे लोक मारले गेले, त्यांच्यासाठी का सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हते.,याची संरक्षणमंत्री, गृहमंत्री तुम्हाला लाज वाटत नाही का, असा सवालही मोदी सरकारला प्रियंका गांधी यांनी विचारला.
मोदींना ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घ्यायचंय, पण यावेळी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारणार का असा सवालही त्यांनी विचारला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पद असताना मणिपूर जळत आहे,असा घणाघातही गांधी यांनी आपल्या भाषणात केला.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्विकारुन संरक्षणमंत्री,गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी करताना प्रियांका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांची नावेही संसदेत वाचून दाखवली. त्यामुळे देशातील जनतेसाठी तुमच्या मनात काहीच जागा नसल्याचा टोलाही प्रियंका गांधी यांनी सरकारला लगावला.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्य सीमेवर लढलं. पण श्रेय मोदींना घ्यायचंय आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. “सरकारला पहलगाममधील हल्ल्यावेळी तिथल्या परिस्थितीबाबत माहिती नव्हती का? हे लोक तिथे सरकारच्या भरवशावर गेले, आणि सरकारनं त्यांना तिथे देवाच्या भरवशावर सोडून दिल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? पंतप्रधान, गृहमंत्र्यांची, संरक्षणमंत्री यांची नव्हती का?” असा संतप्तस सवालही प्रियांका गांधींनी मोदी सरकारला केला.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं या दहशतवादी संघटनेनं घेतली. या संघटनेला भारत सरकारनं 2023 मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. पण त्याआधी तीन वर्षं ते मोकाटपणे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत होते.एवढंच नव्हे, तर एप्रिल 2020 ते 22 एप्रिल 2025 पर्यंत टीआरपीएफनं भारतात 25 दहशतवादी हल्ल्याचा केल्याचा धक्कादायक दावाही प्रियांका गांधींनी लोकसभेत केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.