Priyanka Gandhi ED Case : मनी लाँड्रींग प्रकरणी प्रियांका गांधी अडचणीत; ED च्या आरोपपत्रात पहिल्यांदाच नाव..

Priyanka Gandhi ED Case : दिल्लीतील रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणामध्ये जमीन खरेदी..
Priyanka Gandhi ED Case
Priyanka Gandhi ED CaseSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या नावाचाही समावेश आहे. हे प्रकरण हरियाणातील एका जमीन व्यवहाराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच ईडीने दावा केला होता की, रॉबर्ट वाड्रा लंडनस्थित एका खासगी मालमत्तेत राहत होते, याची चौकशी ईडीकडून सुरु आहे. रॉबर्ट हे काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती आहेत. (Latest Marathi News)

Priyanka Gandhi ED Case
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

विशेष म्हणजे अनिवासी भारतीय (एनआरआय) उद्योगपती सी.सी. थंपी यांच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांचे नावाचा समावेश केला आहे. याआधी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचेही नाव ईडीच्या आरोपपत्रात आले होते. ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि मुलगी प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीतील रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणामध्ये जमीन खरेदी केली होती. त्या एजंटने एनआरआय व्यावसायिक सी. सी. थंपी यांनाही जमीन विकली होती.

Priyanka Gandhi ED Case
Rahul Gandhi News : राहुल गांधी उतरले कुस्तीच्या आखाड्यात, बजरंग पुनियाशी...

काय प्रकरण आहे ?

वाड्रा आणि थंपी यांच्यात व्यावहारीक संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. हे दोघांमध्ये आर्थिक हितसबंध असण्याचा आरोप ईडीकडून केला गेला आहे. वास्तविक, या प्रकरणाचे धागेदोरे 2016 मध्ये ब्रिटनला पळून गेलेल्या संजय भंडारीशीही जोडलेले आहेत. सध्या त्याच्याविरुद्ध ईडी चौकशी करत आहे. यामध्ये मदत करणाऱ्यांमध्ये थम्पी आणि ब्रिटिश नागरिक सुमीत चड्डा यांची नावे असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com