Punjab Election: पंजाबमध्ये भाजप मुसंडी मारणार? दुरावलेल्या जुन्या मित्राची मिळाली साथ; मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा जाहीर

दोन्ही विधेयकाला दिलेला हा पाठिंबा आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकाली दल पुन्हा ‘एनडीए’त येण्याच्या हालचाली असल्याचे मानले जात आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली/चंडीगड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर एका दिवसातच पक्षाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीला पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही विधेयकाला दिलेला हा पाठिंबा आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकाली दल पुन्हा ‘एनडीए’त येण्याच्या हालचाली असल्याचे मानले जात आहे.

Narendra Modi
Umar Khalid: उमर खालिद, शरजील इमाम यांच्या सुटकेसाठी घोषणा देणाऱ्या TISSच्या विद्यार्थ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; कोर्टानं काय म्हटलंय?

केंद्र सरकारच्या लोकसभा मतदारसंघ फेररचनेला पाठिंबा देताना बादल यांनी शनिवारी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये देशात महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करण्याची मागणी केली; तसेच सर्व राज्यांतील जागांमध्ये एकसमान ५० टक्के वाढ करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावालाही अकाली दलाचे समर्थन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘‘शिरोमणी अकाली दलाने आज चंडीगड येथे झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत देशात महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करण्याची मागणी केली,’’ असे बादल यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, ‘‘महिलांच्या सन्मान, समानता आणि अधिकारांची शिकवण देणाऱ्या शीख धर्मगुरूंच्या विचारांमधून शिरोमणी अकाली दल प्रेरणा घेतो. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने आपल्या सभागृहात महिला आरक्षण लागू करून आदर्श घालून दिला आहे. सर्व राज्यांतील जागांमध्ये एकसमान ५० टक्के वाढ करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला अकाली दलाचा पाठिंबा आहे.’’

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना दोन्ही प्रक्रिया तातडीने राबवाव्यात, अशी मागणी बादल यांनी केली.

एप्रिलमध्ये विरोध

एप्रिलमध्ये केंद्र सरकारने संसदेत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले तेव्हा अकाली दलाने त्याला विरोध करून विरोधी पक्षांसोबत मतदान केले होते. त्या वेळी पंजाबविरोधी भेदभाव करणारे विधेयक असल्याची टीका पक्षाने केली होती. मात्र, सध्या भाजपसोबत आघाडीच्या चर्चांना वेग आला असताना ५० टक्के जागावाढीच्या हमीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने या विधेयकाला पाठिंबा जाहीर केल्याचे म्हटले जाते.

Narendra Modi
PM Modi C-Voter: पंतप्रधान मोदी ठरले तरुणांमधील सर्वाधिक लोकप्रिय नेते! राहुल गांधी, अभिजीत दिपके कितव्या क्रमांकावर? C-Voterचा सर्व्हे काय सांगतो?

कृषी कायद्यांवरून मतभेद

भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील जवळपास अडीच दशकांची युती २०२० मध्ये वादग्रस्त कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर कोलमडली होती. त्यावेळी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर २०२२च्या पंजाब विधानसभा निवडणुका आणि २०२४च्या लोकसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com