Shivsena Leader Murder : दूध आणायला गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

Punjab Moga Murder : मंगत राय हे रात्री दहा च्या सुमारास गिल पॅलेस येथे दूध घेण्यासाठी गेले होते. यावेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
Mangat Rai Shot Dead
Mangat Rai Shot DeadSarkarnama
Published on
Updated on

Punjab News, 14 Feb : पंजाबमधील (Punjab) मोगा येथे एका जिल्हाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव मंगत राय असं असून ते मागील अनेक वर्षापासून शिवसेनेशी (Shivsena) संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

राय यांच्यावर गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास हल्ला झाला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

Mangat Rai Shot Dead
Satish Bhosale Arrest : "खोक्या असो नाही तर ठोक्या..."; सतीश भोसले अटक अन् घरावरील बुलडोजर कारवाईनंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, मंगत राय हे रात्री दहाच्या सुमारास गिल पॅलेस येथे दूध घेण्यासाठी गेले होते. यावेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी राय यांना मृत घोषित केलं.

याप्रकरणी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू आहे. दरम्यान, विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा यांनी हल्लेखोरांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Mangat Rai Shot Dead
Tamil Nadu : तमिळ-हिंदी वादाला तोंड फुटलं; '₹' चिन्ह हटवलं; अर्थमंत्री संतापल्या!

तर डीएसपी सिटी रविंदर सिंह यांनी सांगितले की, मंगत राय यांची स्टेडियम रोडवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सध्या त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्याची मागणी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com