Navjot Kaur Sidhu New Party: पंजाब पॉलिटिक्समध्ये ट्विस्ट! क्रिकेटर सिद्धूंच्या पत्नीचा नवा पक्ष; BJP प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

Navjot Kaur Sidhu Announces Bharatiya Rashtravadi Party : नवज्योत कौर सिद्धू यांनी भारतीय राष्ट्रवादी पार्टी (BRP) स्थापन करत भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. नव्या पक्षामुळे पंजाबच्या राजकारणात समीकरणे बदलणार
Navjot Kaur Sidhu New Party
Navjot Kaur Sidhu New PartySarkarnama
Published on
Updated on

Navjot Kaur Sidhu Launches BRP: काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे त्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय राष्ट्रवादी पार्टी (BRP) असे त्यांच्या पक्षाचे नाव असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

नवजोत कौर सिद्धू या माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी आहेत. सोमवारी रात्री उशीरा त्यांनी पक्षाची स्थापना केली.त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण यात नवज्योत सिंह सिद्धू दिसत नसल्याचे ते गैरहजर का होते? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

नवा पक्षाची स्थापना का?

"राजकीय नेत्यांच्या विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी केलेले काम अचूक आहे की नाही, याची तटस्थपणे चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर एक पर्याय म्हणून आम्ही पक्ष स्थापन करुन काम सुरु केले आहे. सामान्य जनतेचे जे हक्क, अधिकार आहेत, ते त्यांना मिळावेत, यासाठी आम्ही कटीबद्ध असू," असे नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.

Navjot Kaur Sidhu New Party
Baramati By-Election: काय होईल बारामतीत? महाराष्ट्रातील राजकीय आघाड्यांचे पोपट मेले आहेत...

BRP मैदानात

भाजपला ठक्कर देण्यासाठी लवकरच भारतीय राष्ट्रवादी पार्टी (BRP) पक्ष विस्ताराची घोषणा करणार असल्याचे संकेत नवज्योत कौर यांनी दिले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी वेळ असला तरी बीआरपीच्या एन्ट्रीनं राज्यात आणखी एका पक्षाची भर पडली आहे. राज्यात सध्या आम आदमी पार्टीचे सरकार आहे. काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. तर भाजप गेले अनेक वर्ष पंजाब आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण त्यांना अद्याप त्यांना यश आलेले नाही.

Navjot Kaur Sidhu New Party
Sunil Shelke News: सुनील शेळकेंच्या आदेशानंतर राजकीय भूकंप; 9 संचालकांच्या निर्णयाने बाजार समिती बरखास्त होणार?

'गोल्डन स्टेट'अशी ओळख पंजाबची होती. ती ओळख सत्ताधाऱ्यांनी पुसून टाकली आहे. पंजाबला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही समविचारी माणसं एकत्र येऊन या पक्षाची स्थापना केली आहे, असे नवज्योत कौर म्हणाल्या.

Navjot Kaur Sidhu New Party
Sharad Pawar News: शरद पवारांनी घेतली तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ; पवारांच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी 500 कोटी रुपयांची गरज असते' तिकीटासाठी कोट्यवधींची डील केली जाते, असे वादग्रस्त विधान गेल्या वर्षी त्यांना केले होते, या विधानानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. कौर यांनी कांग्रेस सोडल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजा अमरिंदर सिंह वडिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com