Raghav Chadha News: केजरीवालांनी सगळं काही देऊनही 'आप'ला सोडचिठ्ठी; भाजप प्रवेशानंतर राघव चड्ढांना 24 तासांच्या आतच सर्वात मोठा झटका

AAP MPs Merger: राघव चड्ढा यांच्यासह आपच्या सहा राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरल्यामुळे राज्यसभेत मोदी-शाह यांचा आवाज वाढणार आहे. तर दुसरीकडे अचानक पडलेल्या राज्यसभा खासदारांच्या 'राजीनामा बॉम्ब'मुळे आम आदमी पक्ष पुरता हादरला आहे.
Raghav Chadha and Arvind Kejriwal
Raghav Chadha and Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा सुरूंग लावण्यात भाजपला मोठं यश आलं आहे. राघव चड्ढा यांच्यासह आपच्या सहा राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरल्यामुळे राज्यसभेत मोदी-शाह यांचा आवाज वाढणार आहे. तर दुसरीकडे अचानक पडलेल्या राज्यसभा खासदारांच्या 'राजीनामा बॉम्ब'मुळे आम आदमी पक्ष पुरता हादरला आहे. राज्यसभेतील उपनेतेपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर 'आप'ला फोडण्यातला मुख्य मोहरा राघव चड्ढा हेच असल्याचं बोललं जात आहेत. पण आता याच चड्ढांना भाजप प्रवेश केल्यानंतर 24 तासांच्या आतच सर्वात मोठा झटका बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अनिश गांवडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हायरल जेन-झी ‘अनफॉलो’ मोहिमेमुळे राघव चड्ढा यांचे 10 लाख फॉलोअर्स 24 तासांत कमी झाल्याचा दावा केला आहे. तसेच याचवेळी त्यांनी इंटरनेट तुम्हाला एका रात्रीत हिरो बनवू शकते, तर हेच इंटरनेट तुम्हाला एका रात्रीत झिरो बनवू शकते,असंही म्हणत चड्ढांना डिवचलं आहे.

दिल्ली व पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी राजकीय शुक्रवारी(ता.24 एप्रिल) घडली. आप पक्षात बंड करत राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह तीन खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच राज्यसभेतील आपच्या एकूण दहापैकी सातजण पक्षातून बाहेर पडले आहेत. पण सगळ्या घडामोडीत सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा राघव चड्ढांची दिसून आली.

पण आता याच राघव चड्ढांनी तडकाफडकी घेतलेला भाजप प्रवेशाचा निर्णय त्यांच्या सोशल मीडियावरील समर्थकांना आवडला नसल्याचं समोर येत आहे. कारण चड्ढांना आप सोडल्यानंतर आणि भाजप प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत इन्स्टाग्रामवर मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळपास 10 लाख फॉलोअर्स एका दिवसांतच कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत 'इंडिया टुडे'ने माहिती दिली आहे.

राज्यसभा खासदार चड्ढा यांचे शुक्रवारी (ता.24) 14.03 मिलियन इतके फॉलोअर्स दिसून आले होते. शनिवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या फॉलोअर्सची संख्या घटल्याचं निदर्शनास आलं. 24 तासांच्या आतच त्यांचे फॉलोअर्स 14.03 वरुन 13.05 मिलियन इतकी कमी झाल्याचं दिसून येत आहे.

Raghav Chadha and Arvind Kejriwal
Operation Lotus : 'आप'नंतर भाजपच्या रडारवर महाराष्ट्रासह देशातील 4 मोठे पक्ष : घटनादुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना हादरे?

दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा

भारतीय संसदेच्या नियमांनुसार कोणत्याही एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करण्यासाठी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असणं बंधनकारक असतो. आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील 10 खासदारांपैकी 7 खासदार फुटल्यामुळे दोन तृतीयांशचा नियमाची अट पूर्ण होत असल्याचं समोर येत आहे.

राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राघव चड्ढा व आपमधून बाहेर पडलेल्या खासदारांनी अधिकृत पत्र सादर स्वतंत्र गट स्थापन केल्याचं बोललं जात आहे. फुटलेले सातही खासदार सभापती सी.पी.राधाकृष्णन यांची शनिवारी (ता.25) भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर आपच्या खासदारांच्या स्वतंत्र गटाचा भाजपमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Raghav Chadha and Arvind Kejriwal
Prashant Kishor : '202 आमदार नव्हे, 10 हजारात विकत घेतलं बहुमत!', प्रशांत किशोर यांचा थेट हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com