Aaditya Thackeray : "राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर भाजपत जावे, कारण...", आदित्य ठाकरेंचं विधान

Aaditya thackeray On Shinde Group : "तुमच्या माथेवरील चोर, निर्लज्ज आणि गद्दारीचा शिक्का कोणीच पुसू शकत नाही," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.
Aaditya thackeray rahul gandhi
Aaditya thackeray rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथ होत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपत प्रवेश केला होता. हाच मुद्दा घेऊन शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी खोचक विधान केलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हायचं असेल, तर भाजपत जावे. कारण, भाजपत गेलेले सगळे आमदार, खासदार काँग्रेसमधीलच आहेत, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

Aaditya thackeray rahul gandhi
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंची लायकीच काढली; म्हणाले, 'ज्याच्या रक्तात गद्दारी...'

लालबाग येथे आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांची 'महानिष्ठा, महान्याय' सभा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. "भाजपनं 'अच्छे दिन आयेंगे' हे सांगायचं बंद केलं आहे. आता 'वॉशिंग पावडर भाजप, डाग अच्छा है', ही त्यांची नवीन टॅगलाईन आहे. तुम्ही भ्रष्टाचारी असाल, खोके घेऊन धोका दिला, खून किंवा दरोडा टाकला असेल, तर तुम्हाला भाजपत घेऊन तेथील कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवतील," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्यसभेच्या निवडणुकीत 6 मधून 4 जण भाजपतील आहेत. कुठे काँग्रेसमुक्त भारत होत आहे? काँग्रेसयुक्त भाजप होत आहे. ज्यांच्यावर आरोप लागले आहेत, ते भाजपत जात आहेत. काँग्रेस आता स्वच्छ झाली आहे. शिवसेनेतील अनेकजण लढत आहेत. किशोरी पेडणेकर, राजन साळवी सुद्धा हिंमतीनं, ताकदीनं लढत आहेत. रवींद्र वायकर यांच्यावर दबाव आहे. संजय राऊत तुरूंगात जाऊन आल्यापासून कुणालाच घाबरत नाहीत. सूरज चव्हाणही लढत आहे," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Aaditya thackeray rahul gandhi
Rohit Pawar : 10 वाजून 10 मिनिटे नाही, तर...; रोहित पवारांनी सांगितली अजितदादांच्या 'घड्याळाची नवी वेळ'

"दुसऱ्या बाजूला आपण केलेली काम पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. पण, दोन गोष्टी मुंबई महाराष्ट्र, देश आणि ज्या 33 देशांनी नोंदी घेतली तिथून पुसू शकत नाही. एक म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेलं काम आणि दुसरं तुमच्या माथेवर चोर, निर्लज्ज, गद्दार म्हणून शिक्का बसलाय तो," अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

Aaditya thackeray rahul gandhi
Shirdi Lok Sabha Constituency : ठाकरे गट सोडल्यानंतरही बबनराव घोलप यांचा खासदारकीचा मार्ग खडतरच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com