Nashik Politics : लाठ्या काठ्यांच्या वादात मुनगंटीवार उतरणार का ?

Sudhir Mungantiwar : नाशिकमधील रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघातील वाद अद्याप मिटलेला नाही. लाठ्या-काठ्यांची भाषा वापरण्यात आली होती.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघातील वाद अद्याप मिटलेला नाही. लाठ्या-काठ्यांची भाषा वापरण्यात आली असून, 19 तारखेच्या गोदाआरतीसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या सर्व गदारोळात तब्बल 12 कोटी रूपयांचा निधी देणारे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार गोदाआरतीसाठी हजर राहतील का ?, याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती सदस्यांच्या निवडीवरून सुरू झालेल्या गोंधाळात दिवसेंदिवस भर पडते आहे. आमच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत साधू महंत आणि पुरोहित संघाने दंड थोपटले आहेत. पुरोहित संघाची मागणी योग्य असल्याचा निर्वाळ देत यास भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही खतपाणी घातले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhir Mungantiwar
Amruta Pawar Vs Chhagan Bhujbal : 'असे लाख गुन्हे दाखल झाले तरी..' ; अमृता पवारांचा भुजबळांना इशारा?

रामकुंड येथे वर्षानुवर्षापासून गोदाआरती होते. मात्र, गोदाआरतीला व्यापक स्वरूप देऊन तेथे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी ठासून सांगितले. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागाकडून जवळपास 12 कोटी रूपयांचा निधी मिळवला. या निधीचा खर्च करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच समितीवर आणखी काही जणांची वर्णी लावण्यात आली.

यात मुख्यत्वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस' या भाजपच्या थिंक टँकमधील सदस्यांचा समावेश आहे. सदर समिती कधी स्थापन झाली. सदस्य निवडीचे निकष काय हे कधीच समोर आले नाही. अत्यंत गुपचूप पद्धतीने हे काम झाल्याचा आरोप पुरोहित संघाकडून सातत्याने करण्यात येत आहे. हिंदू जनभावना जागृत ठेवणे आणि वाढवणे या उद्देशाने मंत्री मुनगंटीवार यांनी निधी दिला खरा पण यामुळे पंचवटीतील हिंदू भाजपविरोधात गेल्याची टीका होऊ लागली आहे.

याविरोधात माजी आमदार सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आगाऊपणा केल्यास लाठ्याकाठ्या काढू, असा इशारा देण्यात आला. तर, प्रसंगी लाठ्या काठ्या खाऊ पण गोदाआरती करूच, अशी भूमिका गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी मांडली. पुरोहित संघाच्या ताब्यात असलेल्या वस्त्रातंर गृहाचा वाद आता पुन्हा उकरण्यात आला असून, ही जागा महापालिका आपल्या ताब्यात घेऊ शकते.

यामुळे वादात तेल घालण्याचे काम झाले. 19 तारखेला पहिली गोदाआरती होणार आहे. तर आज सायंकाळी पुरोहित संघाने आरतीचे नियोजन आखले आहे. गोदाआरतीसाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने मंत्री मुनगंटीवारांना निमंत्रण धाडले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपाच्या गढूळ वातावरणात मंत्री मुनगंटीवार येतील का? तसेच आलेच तर काय भूमिका मांडतील, याविषयी सध्या चर्चांना जोर आला आहे.

Edited By-Ganesh Thombare

Sudhir Mungantiwar
Shirdi Lok Sabha Constituency : ठाकरे गट सोडल्यानंतरही बबनराव घोलप यांचा खासदारकीचा मार्ग खडतरच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com