Rahul Gandhi Challenge PM Modi : नरेंद्र मोदी, अमित शहा आम्हाला थांबवू शकत नाही, राहुल गांधी प्रचंड आक्रमक, ममता बॅनर्जीही दिल्लीय येणार

Rahul Gandhi Protest Jantar Mantar : नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार यांना कारवाईला समोर जावे लागणार आहे. ते देशाची फसवणूक करत आहेत.
Rahul Gandhi has challenged Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah Jantar Mantar
Rahul Gandhi has challenged Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah Jantar Mantarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress Jantar Mantar : राहुल गांधी,प्रियांका गांधी यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला जेरीस आणले आहे. मंगळवारनंतर बुधवारी देखील त्यांनी खासदारांच्यासोबत जंतर-मंतरजवळ आक्रमक आंदोलन केले. पोलिसांनी बलाचा वापर करत त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, राहुल यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'गृहमंत्री अमित शाह यांना चॅलेंज दिले.

ते म्हणाले, ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही.ही देशातील सर्वात पवित्र गोष्टीचे रक्षण करण्याची लढाई आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा असे काहीही करू शकत नाहीत ज्यामुळे आम्हाला थांबवता येईल.'

देशाची फसवणूक मोदी, शहा करत आहेत. त्यांच्यासह ज्ञानेश कुमार आणि संपूर्ण यंत्रणेला नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राहुल गांधींनी दिला.

जनतेला रोखू शकत नाही

राहुल गांधी पुढे म्हणाले की, संसदेत, रस्त्यांवर आणि आज जंतर-मंतरजवळही आपल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ठामपणे उभे राहिलेल्या 'इंडिया' आघाडीच्या प्रत्येक खासदाराचा मी आभारी आहे. ते मोर्चा रोखू शकतात. ते बैठकीला नकार देऊ शकतात. पण ते आपल्या जनतेची इच्छाशक्ती रोखू शकत नाहीत.

Rahul Gandhi has challenged Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah Jantar Mantar
Rahul Gandhi Detained: राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा नेमकं काय घडलं?

काँग्रेस आज काळा दिवस पाळणार

राहुल गांधी, प्रियंका गांधींसह इतर खासदारांवर झालेल्या कथित पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसने आज देशव्यापी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिल्लीत विरोधी पक्षांच्या खासदारांचे मोठे आंदोलन होणार आहे. ममता बॅनर्जी यादेखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. दरम्यान, काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळण्याचे राज्य युनिट्सला निर्देश दिले आहेत.

Rahul Gandhi has challenged Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah Jantar Mantar
Rahul Gandhi Priyanka Gandhi FIR : राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, काय घडलं नेमकं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com