Kokan Drought : फडणवीस सरकारचा पालघरसह रत्नागिरीला मोठा दिलासा; प्रत्येकी तीन तालुके दुष्काळी यादीत, 5 हजारांच्या मदतीसह मिळणार 12 सवलती

Palghar And Ratnagiri drought affected Talukas list : राज्य सरकारने २५ सप्टेंबरला शासन निर्णय काढत ‘ट्रिगर-१’ लागू करत राज्यातील २६५ तालुक्यांना दुष्काळी घोषित केले होते. ज्यात कोकणातील १२ तालुक्यांचा समावेश होता.
Kokan Drought
Kokan DroughtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kokan News : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आणखी 40 तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून, त्यामुळे राज्यातील एकूण 305 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. नव्याने घोषित केलेल्या तालुक्यांच्या यादीत पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोकणातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता 18 झाली आहे.

राज्यातील आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (ता. 14) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली. ट्रिगर-1 आणि ट्रिगर-2 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आतापर्यंत राज्यातील 305 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यापूर्वी ट्रिगर-1 अंतर्गत 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. आता त्यात आणखी 40 तालुक्यांची भर पडली आहे.

पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश

नव्याने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत पालघर जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ट्रिगर-1 अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Kokan Drought
Maharashtra Drought Relief News : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी: दुष्काळी मदतीचे दर, निकष बदलण्याचे संकेत; लवकरच वाढीव दरानं नुकसान भरपाई..?

रत्नागिरीतील आणखी तीन तालुके दुष्काळग्रस्त

रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ट्रिगर-1 अंतर्गत रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. ज्यानंतर येथे राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांना लक्ष केले होते. तर जिल्ह्यातील उर्वरीत तालुके देखील दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावेत अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती.

ज्यानंतर आता लांजा, मंडणगड आणि खेड या आणखी तीन तालुक्यांचा यादीत समावेश झाला आहे. दरम्यान, तळकोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा यापूर्वीच दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.

Kokan Drought
Maharashtra Drought : दुष्काळी परिस्थितीचा आढावा केंद्र सरकारच्या तीन पथकांनी घेतला; आता शेतकऱ्यांना मदत कधी? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत

राज्य सरकारच्या नव्या घोषणेमुळे कोकणातील एकूण 18 तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट झाले आहेत. या तालुक्यांमध्ये शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या 12 सवलती लागू होणार आहेत. तसेच दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रीम मदत देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com