Rahul Gandhi News: केंद्रीय मंंत्र्यांच्या मुलाची बदनामी; राहुल गांधींनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून व्यक्त केली दिलगिरी

Congress Politics: राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये एका सभेत बोलताना ‘पनामा पेपर’ प्रकरणी टीका करताना कार्तिकेय सिंह यांचे नाव घेतले होते. त्यामुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचा दावा करत कार्तिकेय यांनी राहुल यांच्याविरोधात भोपाळ न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली होती.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Jabalpur News : केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय सिंह यांच्याबद्दल केलेल्या कथित बदनामीकारक विधानाबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून दिलगिरी व्यक्त केली आहे. या दिलगिरीनंतर भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये एका सभेत बोलताना ‘पनामा पेपर’ प्रकरणी टीका करताना कार्तिकेय सिंह यांचे नाव घेतले होते. त्यामुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचा दावा करत कार्तिकेय यांनी राहुल यांच्याविरोधात भोपाळ न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर काँग्रेस नेत्याने हे समन्स आणि अब्रुनुकसानीचा खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. राहुल यांचे वक्तव्य कार्तिकेयसिंह यांच्याशी संबंधित नव्हते, असा दावा राहुल यांच्या वकीलांनी राहुल यांच्या दिलगिरीचा अर्ज दाखल करताना केला.

वारंवार दिलगिरी

राहुल गांधी यांनी वारंवार आधारहिन आरोप केले असून न्यायालयाला सामोरे जाण्याची वेळ येताच ते माफी मागतात, अशी टीका भाजपने केली आहे. ‘‘राहुल गांधी हे ‘सराईत खोटारडे’ असून कोणताही पुरावा नसताना ते आरोप करतात. आपले पद विरोधी पक्षनेता नसून बनावटी प्रचारप्रमुख असल्याचे त्यांना वाटते. आधी आरोप करायचे आणि नंतर पळून जायचे, ही त्यांची सवयच आहे,’’ असे भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सुनावले.

Rahul Gandhi News
Mahavikas Aaghadi News: सहा खासदार फुटले, आता महाविकास आघाडीच्या बैठकीला 48 पैकी तब्बल 23 आमदारांची दांडी; ठाकरे-पवार-सपकाळांची धडधड वाढली

दिलगिरी व्यक्त केली म्हणजे कार्तिकेय सिंह यांच्यावर चुकीचे आरोप केले होते, हे राहुल यांनी मान्य केले आहे, असा दावाही पूनावाला यांनी केला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा. स्व. संघावरही आरोप केले होते. नंतर या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांनी न्यायालयात माफी मागितली होती, असेही पूनावाला यांनी निदर्शनास आणून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com