Mahavikas Aaghadi News: सहा खासदार फुटले, आता महाविकास आघाडीच्या बैठकीला 48 पैकी तब्बल 23 आमदारांची दांडी; ठाकरे-पवार-सपकाळांची धडधड वाढली

Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊपैकी तब्बल सहा खासदार फुटले. या फुटीमुळे आधीच अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा एकदा हादरा बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊपैकी तब्बल सहा खासदार फुटले. या फुटीमुळे आधीच अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा एकदा हादरा बसला. यानंतर खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मविआची बैठक बुधवारी(ता.24) झाली. याच बैठकीबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे. त्यात अनुपस्थित राहिलेल्या 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं आणि पक्ष समोर आले आहेत. काँग्रेसचे 6 तर ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी 5 आमदार अनुपस्थित होते. यात मविआतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून महाविकास आघाडीची अक्षरश: दाणादाण उडवली होती. धक्कादायक बाब म्हणजे मविआच्या एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळाचा आकडा गाठण्यात अपयश आलं होतं. यानंतरच्या विधानपरिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती,नगरपालिका या निवडणुकांमध्येही मविआचा धुव्वा उडाला होता. यानंतर मविआत फूट पडल्याचीही चर्चा आहे.

याचदरम्यान, उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेत मविआची पुन्हा एकदा मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत मविआची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे,संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, शशिकांत शिंदे हे नेते उपस्थित होते. पण या बैठकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची नेतेमंडळीनंतर पत्रकारांना अरेरावी अन् मारण्याची धमकी; एकनाथ शिंदे कठोर अ‍ॅक्शन घेणार? पहिली प्रतिक्रिया समोर

मविआच्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील,रोहित पवार,अभिजीत पाटील,संदीप क्षीरसागर हे प्रमुख आमदार नव्हते. तर काँग्रेसच्या नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, अस्लम शेख, विश्वजित कदम, विकास ठाकरे या आमदारांनी या बैठकीला दांडी मारल्याचं समोर आलं आहे.

तर दुसरीकडे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित असतानाही त्यांचे काही आमदार गैरहजर राहिले. त्यात सुनील राऊत,गजानन लवटे,बाबाजी काळे,राहुल पाटील संजय दरेकर या आमदारांचा समावेश आहे. यातील दरेकर आणि राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवालयमधील बैठकीलाही दांडी मारल्याचं समोर आलं होतं.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Sanjay Dina Patil : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं संजय दिना पाटलांबाबत भाष्य : ‘ही वाक्ये आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढचं लक्षात ठेवं, संजय’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com