Sharad Pawar's Final Decision : शरद पवारांची मनधरणी यशस्वी? भेटीनंतर राहुल गांधींचा सूचक इशारा; भेटीत नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi's 40-Minute Meeting With Sharad Pawar : शरद पवार यांच्यासोबतही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली आणि त्यानंतर बैठक संपवून नेते बाहेर पडले.
Delimitation Bill Controversy; Sharad Pawar And Rahul Gandhi
Delimitation Bill Controversy; Sharad Pawar And Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला इंडिया आघाडीतील डीएमके आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत मिळताच काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी चेन्नई येथे जाऊन डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. तब्बल ७० मिनिटे चर्चा करत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात भूमिका घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाल्याचे दिसले नाही. त्यानंतर राहुल गांधी यांनी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

शरद पवार यांच्यासोबतही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली आणि त्यानंतर बैठक संपवून नेते बाहेर पडले. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत शरद पवार यांनी कोणती भूमिका मांडली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, शरद पवार यांच्याकडून सोमवारी (ता. ३०) फोनवर निर्णय कळवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असून ती अपडेट होत आहे...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.