Rahul Gandhi : अमेरिकेत राहुल गांधींसमोरच सॅम पित्रोदांनी उच्चारला ‘पप्पू’ हा शब्द; नेमकं काय म्हणाले?

Sam Pitroda Indian Overseas Congress USA : राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून विविध घटकांशी संवाद साधत आहेत.
Sam Pitroda, Rahul Gandhi
Sam Pitroda, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा ‘पप्पू’ हा शब्द वापरला जातो. त्यावरून राहुलही आपल्याला काहीही म्हटले तरी आपला भाजपविरोधी लढा सुरू राहील, असा पलटवार करतात. सोमवारी अमेरिकेतही राहुल गांधी यांच्यासमोरच काँग्रेस नेत्याने या शब्दाचा उल्लेख केला.

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून विविध घटकांशी संवाद साधत आहेत. एका कार्यक्रमात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राहुल यांचे खूप कौतुक केले. अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी राहुल यांचे कौतुक करताना ते पप्पू नसल्याचे म्हटले आहे.

Sam Pitroda, Rahul Gandhi
Rahul Gandhi : भारत जोडोमुळं मिळालं यश; राहुल गांधी आता स्वतःला तीन पैलूवर तपासणार, ती कोणकोणती?

राहुल गांधी पप्पू नाहीत, खूप शिकलेले आणि समजूतदार आहेत. ते रणनीतीकार आहेत. त्यांचा प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास आहे. भाजप त्यांच्याविषयी मागील दहा वर्षे बोलत आहेत. मला राहुल यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. भारताला जुमल्याची नव्हे तर मॉडर्न विचार आण युवा नेत्यांची गरज असल्याचे पित्रोदा म्हणाले.

मोठ्या मुद्यांवर मार्ग काढणे, हा राहुल गांधींचा अजेंडा आहे. त्यांच्याजवळ व्हिजन असून याउलट त्याविरोधात भाजप कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याची टीकाही पित्रोदा यांनी केली. पित्रोदा यांनी भारताविषयीचे राहुल यांचे व्हिजन काय आहे, याबाबतही भाष्य केले.

Sam Pitroda, Rahul Gandhi
Health Insurance : नितीन गडकरींची नाराजी आज दूर होणार का? सर्वसामान्यांना होईल मोठा फायदा

राहुल गांधी हे वडील राजीव गांधी यांच्या तुलनेत अधिक बुध्दिजीवी आणि रणनीतीकार आहेत, असे पित्रोदा यांनी यापूर्वी म्हटले होते. राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याचे सर्व गुण असल्याचे पित्रोदा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. परदेशात राहुल भारताचे नाव खराब करत असल्याचे भाजपचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना भारत जोडो यात्रा काढण्याचे खरे कारण सांगितले आहे. मीडिया आणि संस्थांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यासाठी थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे राहुल यांनी सांगितले.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com