Rahul Gandhi News : मुलीच्या शिक्षणासाठी धावपळ करणाऱ्या दिव्यांग बापाला राहुल गांधींनी दिला आधार!

Rahul Gandhi Meets Differently-Abled Citizen Manish Rajdev : मनीष राजदेव असे या व्यक्तीचे नाव आहे. ते दिव्यांग असून चालता येत नाही. त्यामुळे कुठेही जाण्यासाठी व्हीलचेअरवरून फिरावे लागते.
Congress Leader Rahul Gandhi
Congress Leader Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने समाजातील विविध घटकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत मदतीसाठी पुढे येत आहेत. कधी रेल्वेतील हमाल तर कधी रिक्षाचालक... कधी चप्पल-बूट शिवणारा तर कधी विद्यार्थ्यांना भेटत त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन देतात. आज त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीची भेट घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

मनीष राजदेव असे या व्यक्तीचे नाव आहे. ते दिव्यांग असून चालता येत नाही. त्यामुळे कुठेही जाण्यासाठी व्हीलचेअरवरून फिरावे लागते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घराबाहेर आले होते. पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती. ही माहिती राहुल यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर मनीष यांना आज भेटण्यासाठी घर बोलावून घेतले.

Congress Leader Rahul Gandhi
भारतीय वंशाच्या 'या' महिला अधिकाऱ्यासाठी 'नासा'ची रिस्क; ट्रम्प यांना दिला होता चकवा

मनीष यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांच्या मुलीला शाळेत प्रवेशासाठी अडचणी येत होत्यात. ती आठ वर्षांची आहे. तिला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मनीष यांची धडपड सुरू होती. त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या इतर समस्यांची सोडवणूक करण्यासाठीही मनीष यांना आश्वस्त केले.

काँग्रेसकडून सोशल मीडियातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी अशाप्रकारे पहिल्यांदाच मदत केलेली नाही. त्यांनी यापूर्वीही गरीब आणि वंचित घटकांतील गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत सरकारमार्फत मदत पोहचविण्यासाठी ते आग्रही असतात.

Congress Leader Rahul Gandhi
Bihar Election : मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसबाबत लालूंची रणनीती ठरली, तेजस्वी यादव यांच्याकडून शिक्कामोर्तब

सामाजिक न्यायावर सातत्याने चर्चा करताना ते दुर्बल घटकांना न्याय देण्याचे आश्वासन देतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधील चप्पल-बूट शिवणाऱ्या रामचेत यांचीही मदत केली होती. मागील वर्षी जुलै महिन्यात एका मानहानीच्या प्रकरणात कोर्टात सुनावणीसाठी ते सुलतानपूरला गेले होते. यादरम्यान प्रवासात त्यांनी अचानक रामचेत यांच्या दुकानाला भेट दिली होती.

या भेटीनंतर राहुल गांधींनी रामचेत यांना एक इलेक्टॉनिक मशीन भेट दिली होती, जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल. त्यानंतर रामचेत यांना राहुल यांनी मुंबईला बोलावले होते. तिथे सुधार कुमार या व्यावसायिकाची भेट घडवून आणली होती. तिथे रामचेत यांनी आपली कला दाखवली होती.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com