Subodh Mohite : माजी अवजड उद्योगमंत्र्यांचा डोळा अनिल देशमुखांच्या मतदारसंघावर!

Subodh Mohite Katol constituency ncp anil Deshmukh : सुबोध मोहिते यांना रामटेक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
anil Deshmukh
anil Deshmukh sarkarnama
Published on
Updated on

Subodh Mohite News: रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री सुबोध मोहिते यांना आता कटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ खुणावतो आहे. अजित पवार यांच्याकडे त्यांनी उमेदवारीसाठी तगादा लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्याय सन्मान यात्रेच्या निमित्ताने ते सक्रिय झाले.

मूळचे शिवसैनिक असलेले मोहिते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते .केंद्रात अटलबिहारी बाजपेयी यांचे सरकार आणि राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते. एनटीसीपीचा ऊर्जा प्रकल्प त्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे खेचून आणला. केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बिनसले. मध्येच खासदारकीचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्यासारखे मातब्बर नेते त्यांच्या प्रचारासाठी आले असतानाही त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून मोहिते यांच्यावर नशीब रुसले. त्यानंतर रामटेक विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना विधान परिषदेचे उमेदवारी जाहीर झाली होती. उमेदवारी दाखल करायच्या दिवशी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी ते नागपूरमध्ये होते. त्यांना मुंबईत पोहचायला उशिर झाल्याने त्यांनी आमदारकी हुकली. त्यानंतर मोहिते यांनी बरेच प्रयोग केले.

anil Deshmukh
Eknath Khadse News : खरं सांगा... नाथाभाऊ, तुमच्या मनातला नेमका पक्ष कोणता; भाजप की राष्ट्रवादी?

काँग्रेस सोडून विनायक मेटे यांच्या शिवसंग्राममध्ये दाखल झाले. शेतकरी संघटनेतही जाऊन आले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांना पक्षाने प्रवक्ते केले होते. या दरम्यान त्यांनी कधीच मीडियाशी संपर्क साधला नाही आणि संवादही साधला नाही. पवारांना सोडून ते आता अजित पवार यांच्यासोबत आले आहेत. दरम्यान वर्धा लोकसभेसाठी ते उत्सुक होते. मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे असल्याने पुन्हा उपेक्षित राहिले.

आता काटोल-नरखेड विधानसभेसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या न्याय सन्मान यात्रेतही ते सहभागी झाले होते. गर्दी जमवण्यासाठी त्यांनी सुमारे साडेतीनशे गाड्या मागून घेतल्या होत्या असे कळते. रामटेकचे माजी खासदार या नात्याने काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघासोबत त्यांचा संबंध आला आहे. ते मूळचे काटोल जिल्ह्यातील आहेत. मात्र आजवर ते काटोलच्या फारशा कधी संपर्कात नव्हते. हे बघता स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधाला त्यांना सामोरे जावे लागू शकते.

(Edited By Roshan More)

anil Deshmukh
MangalPrabhat Lodha News: राज्य सरकारची मोठी घोषणा; लाडकी बहीण योजनेनंतर महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com