

Congress clarification news : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांच्यासोबत एका बोटीवर महिला व मुलगा दिसत आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोशल मीडियात हा फोटो पोस्ट करत राहुल गांधींसोबत हे कोण आहेत, असा सवाल करत फोटोचे गूढ वाढविले होते.
राहुल गांधी यांनी हा फोटो कधी आणि कुठे काढला, त्यांच्यासोबत कोण आहे, अशी विचारणाही गिरीराज सिंह यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमधून केली होती. अखेर काँग्रेसकडून या फोटोवर खुलासा करत गिरीराज सिंह यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या फोटोमागचे गूढ सांगितले आहे.
गिरीराज सिंह यांचा उल्लेख विकृत मानसिकता असा करत सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियात म्हटले आहे की, एखादी महिला आणि पुरुष एकत्र दिसले की त्यांच्या संदर्भात केवळ गलिच्छ विचारच डोक्यात येणाऱ्या एखाद्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीप्रमाणे तुमचे वागणे आहे. फोटोतील महिला आणि मुलगा हे राहुल गांधी यांच्या मित्राची पत्नी आणि मुलगा आहे. कौटुंबिक सुटीसाठी ते एकत्र गेले होते. राहुल गांधी यांचा मित्र या फोटोत नाही, असे सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले आहे.
महिलांना तुमच्यासारख्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींच्या जवळपास वावरतानाही अस्वस्थ वाटते, अशी टीकाही सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे. ओव्हरसिज काँग्रेसचे नेते अवी दंडिया यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत संबंधित फोटोवर खुलासा केला आहे. हा फोटो लेक रॉबर्ट्स टेक्सास येथील आहे. राहुल गांधी यांच्या शेजारी बसलेला मुलगा माझा मित्र रवीचा मुलगा आर्यमन आहे. मुलाशेजारी बसलेली महिला रवीची पत्नी शबनम आहे. गिरीराज सिंह तुम्हाला आणखी काही माहिती हवी आहे का? आता हे खरं आहे की नाही हे तुम्ही शोधा, असे दंडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे २२ जून ते १३ जुलै या कालावधीत परदेशात दौऱ्यावर होते. मात्र, त्यांच्या या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. ते नेमके कोणत्या देशात आहेत, कुणाच्या भेटीगाठी घेत आहेत, याबाबत काँग्रेससह राहुल गांधी यांच्याकडूनही काही माहिती देण्यात आलेली नव्हती. या दौऱ्याबाबत भाजप नेत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.