Navneet Rana News: लोकसभेचा वचपा काढण्यासाठी नवनीत राणांची मोठी घोषणा; मित्रपक्षांची धडधड वाढवली

Mahayuti Vidarbha Politics : भाजपा हा पक्ष घाबरणारा नसून अपक्ष खासदार असतानाही पाच वर्ष प्रत्येक दिवस भाजपासाठी काम करत असल्याचंही राणा यांनी सांगितलं. तसेच आपण हवेमध्ये बोलणारी व्यक्ती नाही. मी जमिनीवर जाऊन लोकांची सेवा करणारी,काम करणारी व्यक्ती असल्याचंही राणा यांनी सांगितलं.
Navneet rana.jpg
Navneet rana.jpgSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : भाजपनं संपूर्ण ताकद लावूनही नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचं अनेकदा बोलूनही दाखवली. पण नवनीत राणा (Navneet Rana) लोकसभेतील पराभव विसरुन आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यातही विशेष म्हणजे अमरावती महापालिकेसाठी मोठी घोषणा करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्रातील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात कोणत्याही क्षणी रखडलेल्या महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील तीनही पक्ष एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी सुरू असतानाच दुसरीकडे अमरावतीच्या (Amravati) भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांची चिंता वाढली आहे.

Navneet rana.jpg
BJP Vs Shivsena UBT: भाजप अन् ठाकरेसेनेत 'बुक वॉर'; राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग'ला 'या' पुस्तकानं प्रत्युत्तर

नवनीत राणा यांनी अमरावती महानगरपालिका भाजप एकट्यानं लढवणार असून कोणत्याच पक्षांसोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या घोषणेद्वारे त्यांनी एकप्रकारे या निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही स्वबळाच्या तयारीचे संकेत दिले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीवर फक्त भगवा आणि भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. अमरावती महानगरपालिकेवर भाजपाचाच झेंडा दिसणार असून कोणासोबतही युती करणार नसल्याचं म्हटलं आहे.

Navneet rana.jpg
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्या : आरोपी मुसळे मानेचा नवा दावा; बॅंक खात्यातील 70 लाख रुपये पगाराचे अन्‌ उसने घेतलेले...

भाजपा हा पक्ष घाबरणारा नसून अपक्ष खासदार असतानाही पाच वर्ष प्रत्येक दिवस भाजपासाठी काम करत असल्याचंही राणा यांनी सांगितलं. तसेच आपण हवेमध्ये बोलणारी व्यक्ती नाही. मी जमिनीवर जाऊन लोकांची सेवा करणारी,काम करणारी व्यक्ती असल्याचंही राणा यांनी सांगितलं.

भाजप नेत्या नवनीत राणा यांनी यावेळी विरोधकांना अभी तो ये झाँकी है,कई लोगों के लिए पिक्चर बाकी है, असा इशाराही दिला. पुढे त्या म्हणाल्या,2024 च्या निवडणुकीमध्ये निवडून मी निवडून येईल याचा पूर्ण आत्मविश्वास होता. तसेच विधानसभेलाही काही लोकांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते जमलं नाही असंही त्यांनी म्हटलं.

Navneet rana.jpg
Uddhav Thacekray : सुट्टीहून मायदेशी परतताच उद्धव ठाकरे नव्या जोमाने अ‍ॅक्टिव्ह; शिवसेना भवनात ठरली नवी रणनीती

माजी खासदार राणा म्हणाल्या,राजकारणात महिलांना अनेक अडथळे निर्माण केले जातात. पण इथं नवनीत राणा महिलांबरोबर उभी आहे. अमरावतीच्या निवडणुकीत महिला उमेदवारांच्या मी स्वतः प्रचारात सहभागी होणार आहे. भाजपच्या चिन्हावर उभे असलेल्यांच्या प्रचाराची जबाबदारी मी नक्की पार पाडेल. तसेच पावसाळा संपेपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका संपणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

निवडणुकीत बरचं काही घडणार आहे. कोणी कुजबुज करत राहतील, त्यात मी काही अडकणारी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील. अमरावतीमध्ये आठपैकी सात आमदार आपले आहेत, तर महापालिका, झेडपी आणि पंचायत समितीवर आपला भगवा झेंडा का फडकू शकत नाही? कार्यकर्त्यांना बहुमतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व नेते घेऊ, असा विश्वास देखील नवनीत राणा यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com