Rahul Gandhi : अंधभक्त, मूर्ख अन् अमित शाह..., राहुल गांधीचे 'ते' शब्द अन् लोकसभेत गदारोळ; कामकाज स्थगित

Lok Sabha Ruling MPs Demand Apology : राहुल गांधी यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हा अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिले, असा आरोप केला.त्यामुळे सत्ताधारी खासदारांनी सभागृहात गदारोळ केला.
Ruling party MPs protest in the Lok Sabha following Rahul Gandhi's remarks, leading to a heated exchange and disruption of House proceedings.
Ruling party MPs protest in the Lok Sabha following Rahul Gandhi's remarks, leading to a heated exchange and disruption of House proceedings.sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : लोकसभेतील चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप खासदार आक्रमक झाले. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा हवाल देत त्यांनी सांगितले की, 'भारतात विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त असे तीन प्रकारचे लोक आहेत.'

त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी खासदारांनी जोरदार आक्षेप घेत गदारोळ केला. राहुल गांधी यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हा अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिले, असा आरोप केला. अमित शाह यांचे नाव घेतल्याने पुन्हा सत्ताधारी खासदार आक्रमक झाले. त्यांनी राहुल गांधींच्या भाषणात अडथळे आणत यावर पुरावा देण्याची मागणी केली.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेत म्हटले, "राहुल गांधी अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींनी कोणत्या आधारावर हे विधान केले, हे स्पष्ट करावे किंवा संपूर्ण सभागृहाची माफी मागावी."

विरोधी सदस्यांनीही गृहमंत्र्यांच्या माफीची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राहुल गांधींची बाजू घेत म्हटले, "जर विरोधी पक्षनेत्यांनी इतका गंभीर आरोप केला असेल, तर पोलिसांनी कोणत्या आदेशावरून विद्यार्थ्यांशी असे वर्तन केले, हे स्पष्ट करणे सरकारची जबाबदारी आहे."

यावर उत्तर देताना किरेन रिजिजू म्हणाले, "चौकशीची मागणी करणे वेगळे; पण राहुल गांधी यांनी थेट नाव घेऊन अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उद्या उठून कोणताही सदस्य कुणावरही असा आरोप करेल का? जसे की राहुल गांधींनी कुणाचा मर्डर केला आहे, असे आम्ही इथे बोलू शकतो का? त्यांना या विधानाचा आधार सांगावाच लागेल किंवा माफी मागावी लागेल."

Ruling party MPs protest in the Lok Sabha following Rahul Gandhi's remarks, leading to a heated exchange and disruption of House proceedings.
CJP Protest: एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक राहिलेला नेता आला समोर, 'सीजेपी'च्या पेटलेल्या आंदोलनात घेतली उडी,भाजप सरकारला झाप झाप झापलं

राहुल गांधी यांनी माफी मागितल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा पवित्र सत्ताधारी खासदारांनी घेतला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी अडीच पर्यंत स्थगित केले.

'अंधभक्त' शब्दावरून रणकंदन

राहुल गांधी 'अंधभक्त' शब्दाच्या उल्लेखावरून लोकसभा अध्यक्षांनी त्यांना विधेयकावरच बोलण्याचे निर्देश दिले. तसेच असे शब्द सभागृहाच्या आणि बाहेरच्या मर्यादेला धरून नाहीत. जे शब्द असंसदीय असतील, ते कामकाजातून हटवले जातील," म्हटले.

इडियट' 'स्टूडेंट' आणि 'अंधभक्त'

राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवर बोलताना 'इडियट', 'स्टूडेंट' आणि 'अंधभक्त' या तीन वर्गवारींचा उल्लेख केला. "विद्यार्थी ८-१० तास अभ्यास करतात, शिक्षण महाग झाले आहे," असे सांगताना त्यांनी वापरलेल्या शब्दांवर सत्ताधाऱ्यांनी पुन्हा जोरदार आक्षेप घेतला आणि हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.

यावर राहुल गांधी यांनी "मी 'इडियट'ऐवजी दुसरा शब्द देतो," असे म्हटले असता, अध्यक्षांनी "तुम्हाला व्यवस्था देण्याची गरज नाही, मी आधीच निर्णय दिला आहे," असे बजावले.

Ruling party MPs protest in the Lok Sabha following Rahul Gandhi's remarks, leading to a heated exchange and disruption of House proceedings.
Rahul Gandhi protest : राहुल गांधींनी फिरवलं राजकारण! काँगेसच्या मनासारखं घडलं... एक घटना ठरली गेमचेंजर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com