Rahul Gandhi: "इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधींनी सोडावं", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची खळबळजनक सूचना; नेमकं कारण काय?

Rahul Gandhi: देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या विरोधात काँग्रेसप्रणित इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्ल्युजिव्ह अलायन्स अर्थात इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदाची जबबादारी सध्या राहुल गांधी यांच्याकडं आहे.
Rahul Gandhi Upset
Rahul Gandhi UpsetSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडावं अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. त्यांच्या या सूचनेमुळं एकच खळबळ उडाली असून आपल्या या सूचनेमागचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर राहुल गांधींनी आपल्यावरील ही जबाबदार इतर कोणाकडं सोपवावी हे देखील अय्यर यांनी सांगितलं आहे.

Rahul Gandhi Upset
Bhaskar Jadhav: "...तर महाराष्ट्र पेटला असता", भास्कर जाधवांनी घेतली शरद पवारांची बाजू; अजित पवारांच्या निधनावर विधानसभेत शोक प्रस्ताव

मणिशंकर अय्यर म्हणाले, "ममतादीदींच्या शिवाय इंडिया आघाडीतील आय आणि एन तसंच डी आणि आय हे सगळं निघून जाईल. त्यामुळं मला आशा आहे की राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी कायम राहण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या आघाडीचं नेतृत्व त्यांनी प्रादेशिक छोट्या पक्षांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर सोपवावं. यामध्ये डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन असतील, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी असतील किंवा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव अथवा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव असतील यांच्यापैकी कोणाकडंही सोपवावं"

Rahul Gandhi Upset
Iran US War : 'मिळेल त्या मार्गाने इराण सोडा'! युद्धाची चिन्ह दिसताच भारताकडून 'ॲडव्हायझरी' जारी; परिस्थिती गंभीर

काँग्रेसची अय्यर यांच्यावर टीका

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या या विधानावर काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. मणिशंकर अय्यर हे भानावर नाहीत. जर ते भानावर असते तर त्यांनी राहुल गांधींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडून दुसऱ्या काँग्रेसच्या व्यक्तीकडं ते सोपवावं अशी मागणी केली असती. त्यामुळं खरंतर ते काँग्रेसी आहेत असं तरी कसं म्हणावं? कारण राहुल गांधींच्या तुलनेत बाकीच्या प्रादेशिक पक्षाचे नेते तुलना योग्य नाहीत. कारण राहुल गांधी सध्या संसदेत पक्षाच्या ९९ खासदारांसह उभे आहेत. बाकीच्या पक्षांचे किती खासदार आहेत? ममतादीदी गोव्यात निवडणूक लढायला गेल्या पण त्यांच्या तृणमूल काँग्रेसची काय हालत झाली आपण सर्वानी पाहिलं आहे. राहुल गांधींशिवाय इथं इतर कोणीही इतक्या तकदीनं भाजपविरोधात उभं राहू शकत नाही, असं एका काँग्रेस प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

सध्या इंडिया आघाडीचं नेतृत्तव कोणाकडं?

दरम्यान, इंडिया आघाडे अधिकृत अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. पण लोकसभेत इंडिया आघाडीचं नेतृत्त विरोधीपक्ष नेते राहुल गांधी करत आहेत. तर राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com