
Pune News : काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विरुद्ध माजी खासदार चंदक्रांत खैरे यांच्यात जोरदार खटके उडाले होते. या वादाची तक्रार थेट 'मातोश्री'च्या दारापर्यंत पोहोचली होती. उद्धव ठाकरेंनी कान टोचल्यानंतर दोन्हीही नेत्यांनी वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण अंबादास दानवे-खैरे (Ambadas Danve) यांच्यात अजूनही शीतयुध्द सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतला आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अंबादास दानवे आणि आणि फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) हे दोन दिग्गज नेते सगळ्यांसमोरच भिडले असल्याचं समोर आलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पुढेच तू-तू मै-मै झाल्याचे पाहायला मिळाले.
पुरंदर विमानतळाला जागा देण्यास सात गावांचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची जमीन देणार नाही अशी भूमिका स्थानिक गावकऱ्यांनी घेतली आहे. असं असताना देखील प्रशासनाकडून या भागामध्ये ड्रोन सर्वे करण्यात येत होता. या ड्रोन सर्वे ला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला.
शेतकऱ्यांकडून होणारा विरोध पाहता प्रशासनाने मोठा फौज फाटा या सर्वच्या निमित्ताने तैनात केला होता. प्रशासना कडून होणाऱ्या जबरदस्ती सर्वे नंतर शेतकरी काहीसे आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांडा फोडला तसेच लाठीमारत केला असल्याचा देखील सांगितलं जात आहे. या सगळ्या तणावाच्या वातावरणामुळे एका वृद्ध महिलेचा निधन झाला असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते या गावकऱ्यांच्या भेटीला गेले होते. या नेत्यांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, आमदार सचिन अहिर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. सर्वप्रथम या नेत्यांनी पोलिसांच्या लाठीमार मध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर एका मोठ्या मंचावरून त्या नेत्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यानंतर माध्यमाचे संवाद करण्यासाठी अंबादास दानवे हे स्टेजच्या खाली उतरले तर दुसरीकडे सुषमा अंधारे या स्टेजवरून शेतकऱ्यांशी संवाद साधत होत्या. अंधारे या माईकच्या माध्यमातून स्टेजवर संवाद साधत असल्याने अंबादास दानवे यांच्या माध्यम संवादामध्ये अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अंबादास दानवे यांनी सुषमाताई जास्त बोलू नका असा आवाज दिला.
त्यावर सुषमा अंधारे यांनी ज्या कामासाठी आलाय ते तरी आधी करा असं प्रत्युत्तर दिल. त्यावर दानवे यांनी जरा पाच मिनिटात थांबा ना असं सुषमा अंधारे यांना सांगितलं. त्यावर जी लोक आली आहेत त्यांना त्यांच्या लेकरांची काळजी आहे असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांना नाही दानवे यांना दिलं. दोन्ही नेत्यांमधला वाद वाढत असल्याचे दिसून येताच सचिन अहिर यांनी मध्यस्थी करत अंधारेंना माईक खाली ठेवून, खाली माध्यमांच्या इथे या असा सल्ला दिला. त्यानंतर या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, या वादाची चर्चा उपस्थित यामध्ये रंगली होती. जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं गरजेचं आहेच, पण त्याचवेळी जाहीरपणे एकमेकांना अशाप्रकारे टोमणे मारण्यानं त्याचीच चर्चा जास्त होते, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे. असं उपस्थितांमधून स्वर उमटल्याचं पाहायला मिळालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.