Rahul Narwekar Meet Tushar Mehta : राहुल नार्वेकरांनी घेतली सॉलिसिटर जनरल मेहतांची भेट; काय झाली चर्चा?

Rahul Narvekar News : राहुल नार्वेकर दिल्ली दौरा आताच का?
Rahul Narvekar News :
Rahul Narvekar News : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेच्या नव्या इमारतीचे येत्या २८ मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या उद्धाटन सोहळ्याचं निमंत्रण आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. याविषयी विधीमंडळ सचिवालयात माहिती मिळेल, याबाबत आपल्याकडे अधिकृत माहिती नाही, असे नार्वेकरांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Rahul Narvekar News :
Suspension Of Ashish Deshmukh: मोठी बातमी! आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण ?

दरम्यान, राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान देशाचे सॉलिसिटर जनरल यांची भेट घेतली. दिल्लीत त्यांना पत्रकारांनी विचारले की, "तुम्ही दिल्लीत आलेल्या आहात, काही राजकीय गाठीभेटी झाल्यात का?" यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, "अनेक कामं होती. काही मतदारसंघातली कामे होती. या सगळ्या गोष्टीमुळे दिल्लीत दौऱ्यावर आले आहे, असे ते म्हणाले.

Rahul Narvekar News :
Maval BJP News: मावळात भाजपचा सूज्ञपणा; बाजार समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत घेतला 'हा' निर्णय

विरोधकांचा बहिष्कार -

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता बहिष्कार टाकण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC), आम आदमी पार्टी (AAP), सीपीएम (CPM), सीपीआय (CPI) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरेगटासह एकूण १९ पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com