ED New Director : राहुल नवीन असणार ईडीचे नवे संचालक; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मिश्रांच्या जागी नियुक्ती

Central Government : मिश्रा यांना १५ सप्टेंबरनंतर मुदवाढ देण्यात येऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.
ED New Director
ED New DirectorSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर केंद्र सरकारने सक्तवसुली संचनालयाच्या संचालकपदी संजय मिश्रा यांच्या जागी राहुल नवीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९९३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. (Rahul Navin will be the new director of ED)

केंद्र सरकारने संजय मिश्रा यांना दोन वेळा ईडीच्या संचालकपदी कार्यकाळ वाढवून दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापलं होतं. मिश्रा यांना १५ सप्टेंबरनंतर मुदवाढ देण्यात येऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आज मिश्रा यांना मुदतवाढ न देता राहुल नवीन यांना संधी देण्यात आली आहे.

ED New Director
Pradip kand News : प्रदीप कंदांचा ‘मास्टर स्ट्रोक’; मर्जीतील तालुकाध्यक्ष नेमून उमेदवारीची दावेदारी केली पक्की!

राहुल नवीन हे बिहारचे असून ते १९९३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या ईडीचे विशेष संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कामाच्या वेगासाठी ते ओळखले जातात. नवीन हे २०१९ मध्ये ईडीमध्ये दाखल झाले आहेत. आता ते ईडीचे मुख्य संचालक असणार आहेत.

मिश्रांना मुदतवाढ देण्यास कोर्टाचा प्रतिबंध

दरम्यान, संजय कुमार मिश्रा हे २०१८ मध्ये ईडीचे संचालक झाले होते. त्यांचा कार्यकाळ हा २०२० मध्ये संपणार होता. मात्र, त्यांना केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये पूर्ण होण्याआधी त्यांना दोनऐवजी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आलेला होता.

ED New Director
Pavana Water Project : कट्टर विरोधक शेळके, भेगडे मोर्चाच्या नेतृत्वासाठी आले एकत्र; पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन

केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) अधिनियम अंतर्गत केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये एक सुधारणा अध्यादेश काढला होता. त्यानुसार, मिश्रा यांना १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत काम करता येणार होते. मात्र, त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने ही सुधारणा रद्द केली आहे.

ED New Director
Sambhaji Raje Announcement : सोलापूर, माढ्यासह लोकसभेच्या ४८ जागा स्वराज्य पक्ष स्वबळावर लढवणार; संभाजीराजेंची घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com