Mamata Banerjee : राज्यपालांकडून ममता बॅनर्जींना झटका; TMC च्या मनुसब्यांवर पाणी फिरणार?

Aparajita Bill Rape Murder Case Ananda Bose : रेप प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले अपराजिता बिल काही काही दिवसांपूर्वीच विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
Mamata Banerjee, Ananda Bose
Mamata Banerjee, Ananda BoseSarkarnama
Published on
Updated on

Kolkata : पश्चिम बंगालमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचललं. रेपच्या प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक विधानसभेत काही दिवसांपूर्वीच मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून राज्यात आपली प्रतिमा सुधारण्याचा ममतांचा आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे मनसुबे आहेत.

‘अपराजिता’ असे विधेयकाचे नाव असून त्याची देशभरात चर्चा सुरू आहे. पण विधानसभेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपाल आनंदा बोस यांनी विधेयक अडवल्याचा दावा टीएमसीने केला आहे. मात्र, ममता सरकारने आपल्याकडे टेक्निकल रिपोर्ट पाठवला नसल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे. त्यामुळे विधेयकाला मंजुरी मिळणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Mamata Banerjee, Ananda Bose
Sitaram Yechury : सीताराम येचुरींची प्रकृती पुन्हा बिघडली; दिल्ली 'AIIMS'मध्ये व्हेंटिलेटरवर!

टेक्निकल रिपोर्ट आल्याशिवाय अपराजिता विधेयकाला मंजूरी दिली जाऊ शकत नाही. राजभवनकडून गुरूवारी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून राज्यपालांनी ममता सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ममता सरकारने महिलांशी संबंधित विधेयकाबाबत कोणतीही तयारी केलेली नाही. यापूर्वीच काही विधेयकांचे टेक्लिकल रिपोर्ट राजभवनात पाठवले नाही. त्यामुळे विधेयक प्रलंबित राहतात. त्यानंतर सरकार राजभवनावर आरोप करते, पत्रकात म्हटले आहे.

राज्यपालांनी अपराजिता विधेयक आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशच्या विधेयकाची नक्कल असल्याचा आरोप केला आहे. अशाप्रकारची विधेयके राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. लोकांना धोका देण्यासाठी ममता बॅनर्जी आंदोलनात सहभाग घेत आहेत. त्यांचे सरकारकडून सर्वसामान्यांच्या हिताचे संरक्षण केले जात आहे, असेही राज्यपालांनी म्हटले होते.

Mamata Banerjee, Ananda Bose
Arvind Kejriwal : ...अखेर केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून!

दरम्यान, अपराजिता विधेयकाला विधानसभेत भाजपनेही पाठिंबा दिल्याने हे विधेयक एकमुखाने मंजूर करण्यात आले आहे. रेप आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेपनंतर पीडित महिलेची स्थिती गंभीर असल्यासही फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. पोलिसांना रेपच्या प्रकरणांची चौकशी 21 दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. यांसह अनेक महत्वाच्या तरतूदी विधेयकात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com